Chana Crop Variety : हरभरा लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

Team Agrowon

कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभऱ्यासाठी वाण

कोरडवाहू तसेच ओलिताखालील हरभऱ्यासाठी विजय, दिग्विजय, राजविजय-२०२, राजविजय-२०४, जाकी,  आयसीसीव्ही-१०, पीकेव्ही कांचन, फुले विक्रम, बीडीएनजी-७९७, फुले विक्रांत किंवा विश्‍वराज या देशी किंवा सुधारित वाणांची शिफारस करण्यात आली आहे. 

Chana Crop Variety | Agrowon

विजय

हरभऱ्याच विजय हे वाण जिरायती जमिनीत लागवड केल्यास ८५ ते ९० दिवसात तयार होत तर बागायती परिस्थितीत १०५ ते १९० दिवसात तयार होत. हे वाण मर रोगाला प्रतिकारक असून पाण्याचा ताण सहन करणारं आहे. याशिवाय जिरायती, बागायती भागास आणि उशिरा पेरणीसाठीही हे वाण योग्य मानल जात.  

Chana Crop Variety | Agrowon

विशाल

हरभऱ्याच विशाल हे वाण ११० ते ११५ दिवसात तयार होतं. या वाणापासून जिरायती जमिनीत सरासरी हेक्टरी १३ क्विंटल उत्पादन मिळत तर बागायती जमिनीत सरासरी हेक्टरी २० क्विंटल उत्पादन मिळत. 

Chana Crop Variety | Agrowon

दिग्विजय

हरभऱ्याच्या इतर वाणापैकी महत्वाच वाण आहे  दिग्विजय. हे वाण बागायती परिस्थितीत ११०-११५ दिवसात तयार होत. हे वाण मर रोगाला प्रतिकारक आहे. तसच जिरायती, बागायती आणि उशिरा पेरणीसाठी हे वाण  योग्य मानल जात.

Chana Crop Variety | Agrowon

फुले विक्रम

हरभऱ्याच फुले विक्रम हे वाण उंच वाढत असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त आहे.  पीक लोळत नाही. याशिवाय मर रोगाला प्रतिकारक असून जास्त उत्पादन देत.  

Chana Crop Variety | Agrowon

विभागानूसार वाणाची शिफारस

हरभऱ्याची जाकी-९२१८, पीडीकेव्ही कांचन, पीडीकेव्ही कनक ही वाणं विदर्भ विभागासाठी प्रसारित करण्यात आली आहेत.  बीडीएनजी-७९७  म्हणजेच आकाश हे वाण मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आले आहे.  याशिवाय हरभऱ्याची जवाहर ग्राम-२४, राजविजय २०२, राजविजय २०४ ही वाणेही चांगल उत्पादन देतात.  

Chana Crop Variety | Agrowon

पुसा मानव

पुसा मानव हे वाण मर रोगाला प्रतिकारक्षम असून कोरडी मूळकुज, मानकुज आणि खुजा रोगाला प्रतिकारक आहे. 

Chana Crop Variety | Agrowon
ancient stepwells | Agrowon
आणखी पाहा...