Raisin Market Sangli : सांगलीतील तासगाव बाजार समितीत पहिल्याच सौद्यात ४९ टन नव्या बेदाण्याची आवक

Tasgaon Raisin Rate : सतीश माळी यांच्या सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांच्या हस्ते नव्या बेदाण्याचे सौदे काढून नवीन बेदाणाचा प्रारंभ करण्यात आला.
Raisin Market Sangli
Raisin Market Sangliagrowon
Published on
Updated on

Tasgaon Market Committee Raisin : सांगली जिल्ह्यातील तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या नव्या बेदाण्याचे सौदे पार पडले. पहिल्याच सौद्यात ४९ टन नव्या बेदाण्याची आवक झाली, तर २५५ रुपये किलो इतका दर मिळाला. यावेळी तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी बेदाणा सौद्यास भेट दिली.

तासगाव बेदाणा बाजारपेठेत या वर्षी १५ दिवस उशिरा नव्या बेदाण्याची आवक झाली. सतीश माळी यांच्या सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांच्या हस्ते नव्या बेदाण्याचे सौदे काढून नवीन बेदाणाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सभापती युवराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बारा दुकानांमध्ये नव्या बेदाण्याचे आगमन झाले. त्यापैकी बबन कदम (आगळगाव) व विजयालक्ष्मी वादीकर (अंकलगी) यांच्या हिरव्या बेदाण्याला २५५ रुपये किलो असा विक्रमी दर मिळाला.

रेवणसिद्ध कोहलगी (तिकोटा) यांच्या हिरव्या बेदाण्याला १३६ रुपये, हनुमंत सूर्यवंशी यांच्या हिरव्या बेदाण्याला २५१ रुपये तर कृष्णा पांढरे (रा. कागनरी ता. जत) यांच्या बेदाण्याला २५१ रुपये किलो असा दर मिळाला. अडत दुकानांमध्ये यावेळी मुहुर्ताचे सौदे काढण्यात आले". अशी माहिती पाटील यांनी दिली.

Raisin Market Sangli
Kolhapur : समृद्धीसाठी चौपट मोबदला; नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी का नाही? कोल्हापूरच्या नेत्यांचा पालकमंत्र्यांना सवाल

तासगाव द्राक्ष बाजारपेठेत ४२० टन बेदाण्याची आवक झाली, तर २५० टन बेदाण्याची विक्री झाली. मुहुर्ताच्या बेदाणा सौद्यासाठी बाजार समितीच्या संचालकांसह सचिव चंद्रकांत कणसे, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजू कुंभार, विनीत बाफना, सुशील हडदरे, जगन्नाथ घनेरे, संजय बोथरा, सुभाष हिंगमिरे, राहुल बाफना, गगन अग्रवाल, राजू माळी, राम माळी यांच्यासह खरेदीदार, व्यापारी, सांगली, सोलापूर, कर्नाटक येथील बेदाणा उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com