Urad, Chana and Moong
Urad, Chana and MoongAgrowon

Pulses Import: विक्रमी आयातीमुळे कडधान्ये दबावात

Pulses Rate: ‘‘केंद्र सरकारने कडधान्य आयात शुल्कमुक्त केली आहे. त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन तूर, हरभरा, उडीद, पिवळा वाटाण्यासह सर्वच कडधान्यांचे भाव घसरले आहेत.
Published on

Pune News: ‘‘केंद्र सरकारने कडधान्य आयात शुल्कमुक्त केली आहे. त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन तूर, हरभरा, उडीद, पिवळा वाटाण्यासह सर्वच कडधान्यांचे भाव घसरले आहेत. तूर तर अगदी प्रति क्विंटल सहा हजार रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे केंद्राने कडधान्य आयात कमी करावी; शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला तरच देशाला कडधान्यात आत्मनिर्भर होता येईल,’’ असे ॲग्री फार्मर ॲण्ड ट्रेड असोसिएशनने म्हटले आहे.

देशातील कडधान्याचा बाजार आयात मालामुळे दबावात आहेत. देशात विक्रमी ६७ लाख टन कडधान्याची आयात गेल्या वर्षभरात झाली. त्यामुळे कडधान्यांच्या दरात नरमाई आहे. देशात यंदा कमी उत्पादन झालेल्या तुरीचेही भाव केवळ आयातीमुळेच पडले आहेत. सध्या तूर हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दरात विकली जात आहे. त्यामुळे सरकारने स्वस्त कडधान्य आयात कमी करावी, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करत आहेत.

Urad, Chana and Moong
Agrowon Podcast: टोमॅटोच्या दरात तेजी; हिरवी मिरची टिकून, केळीला उठाव, कोथिंबीर नरमली तर तुरीचा बाजार दबावातच

देशातील कडधान्य उत्पादनही चांगले होते. त्यातच सरकारने आयात खुली केल्यामुळे देशात सध्या कडधान्यांचा साठा मागणीपेक्षा अधिक आहे. देशाच्या बंदरांवरील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्य आहेत. काही बंदरांवर रशिया आणि कॅनडामधून आलेला पिवळा वाटाणा पडून आहे. त्यामुळे सरकारने आयात कमी करून दरातील घसरण थांबवावी, अशी मागणी होत आहे.

मागच्या वर्षी देशात हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले होते तेव्हा पुरवठा वाढीसाठी पिवळा वाटाणा आयातीवरील शुल्क कमी करावे, अशी मागणी ॲग्री फार्मर ॲण्ड ट्रेड असोसिएशनने केली होती. आता देशात पुरेसा पुरवठा आहे. त्यामुळे आयात कमी करावी, अशी मागणी या असोसिएशनने केली आहे. देशातील कडधान्य उत्पादन चांगले आहे. त्यातच आयात वाढल्याने देशातील पुरवठा अतिरिक्त झाला. त्याचा दबाव दरावर येत आहे, असेही या असोसिएशनने म्हटले आहे.

Urad, Chana and Moong
Pulses Import: कडधान्य आयातीमुळे बिघडणार शेतकरी आणि ग्राहकांचेही गणित

सरकारने तूर, उडीद आणि पिवळा वाटाणा आयात मार्च २०२६ पर्यंत खुली केली आहे. यात पिवळा वाटाणा सर्वात स्वस्त आहे. जवळपास ४०० डॉलर प्रतिटन दराने वाटाणा आयात होत आहे. भाव कमी असल्याने त्याचा दबाव इतरही कडधान्यांवर येत आहे. कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या सरकारच्या उद्दिष्टालाही आयातीचा फटका बसत आहे.

किमतीत मोठी घसरण

देशात पिवळा वाटाणा, हरभरा, तूर, मसूर आणि उडदाची आयात वाढल्यानंतर या कडधान्यांचे भाव कमी झाले. हरभरा आपल्या उच्चांकी दरावरून ५५०० रुपयांपर्यंत नरमला. तुरीचे भाव हमीभावापेक्षा किमान एक हजाराने कमी आहेत. तर पिवळ्या वाटाण्याचे भावही एक हजाराने घसरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com