Soybean Market Rate : सोयाबीन भावासाठी मध्यप्रदेशात आंदोलन पेटले; सोयाबीनला हमीभाव नको तर ६ हजार रुपयांची शेतकऱ्यांची मागणी

Farmer Demand : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हमीभावाने खरेदीला विरोध केला. सोयाबीनची ६ हजाराने खरेदी करा किंवा हमीभावाने खरेदी करून ११०० रुपये बोनस द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हमीभावाने खरेदीला विरोध केला. सोयाबीनची ६ हजाराने खरेदी करा किंवा हमीभावाने खरेदी करून ११०० रुपये बोनस द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकरी मध्य प्रदेशात आंदोलनही करत आहेत. तसेच १६ तारखेपासून राज्यपातळीवर आंदोलन पुकारले. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत कसे आंदोलन होणार, याची दिशाही जाहीर करून टाकली. 

केंद्र सरकारने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात हमीभावाने म्हणजेच ४ हजार ८९२ रुपयाने सोयाबीन खरेदीला मान्यता दिली. पण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे राज्य असलेल्या मध्य प्रदेशात शेतकरी मागील काही दिवसांपासून सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रेंडही चालवला. पण सरकारने हमीभावाने म्हणजेच ४ हजार ८९२ रुपयाने सोयाबीन खरेदीचे जाहीर केल्यानंतर शेतकरी मात्र चांगलेच आक्रमक झाले. मध्य प्रदेशातील उत्पादनात महत्वाच्या खंडवा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कालच भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा काढला. या हा मोर्चा ७ किलोमीटर होता. या मोर्चात ७ हजार शेतकरी ५०० ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. 

Soybean
Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानासाठी १ हजार ५९३ कोटी वाटपाला मंजूरी

यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर टिका केली. सरकारने जाहीर केलेला हमीभाव परवडत नाही. त्यामुळे सरकारने सोयाबीनची ६ हजार रुपयाने खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच जर हमीभावाने खरेदी करणार असेल तर शेतकऱ्यांना ११०० रुपये बोनस द्या, अशीही मागणी शेतकरी करत आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. 

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी आता १६ तारखेला आंदोलन जाहीर केले. या आंदोलनात मध्य प्रदेशातील अनेक शेतकरी संघटना सामिल होणार आहेत. १६ तारखेला राज्यभरात प्रदर्शन, चक्काजाम आणि मोर्चा होणार आहे. यानंतरही सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा येथील शेतकरी संघटनांनी दिला. काॅंग्रेस पक्षानेही शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठींबा दिला. 

Soybean
Soybean Rate: केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या राज्यातच सोयाबीन भावासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

संयुक्त किसान मोर्चामध्ये मध्य प्रदेशातील ५५ शेतकरी संघटना सामिल आहेत. संयुक्त किसान मोर्चा मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे मोर्चाच्या राज्य अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. संयुक्त किसान मोर्चाने २० ते २७ सप्टेंबर दरम्यान धरणे आंदोलन. २८ सप्टेंबर रोजी काॅर्पोरेट विरोधी दिवस आणि ३० सप्टेंबरला भोपाळ येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. 

आता सोयाबीनचा भाव फक्त मध्य प्रदेशातच कमी नाही. महाराष्ट्रतही कमी आहे. पण सोयाबीन भावाचा मुद्दा मध्य प्रदेशाच चांगलाच पेटला. महाराष्ट्रात मात्र सोयाबीनच्या भावासाठी आंदोलनाची तीव्रता दिसत नाही. सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र येतो. दोन्ही राज्यांमध्येमिळून ८० टक्क्यांपेक्षाही जास्त उत्पादन होते. सोयाबीनचा भाव पडल्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांनाही बसत आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातही जोड मिळाली तर केंद्र सरकारवरही दबाव वाढेल. विशेष म्हणजे राज्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आंदोलनाला सरकार गांभीर्याने घेईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com