Soybean Market : डीओसी सोयाबीनच्या मागणीअभावी दर दबावात

Soybean DOC : सोयाबीन दरवाढीची शक्यता सध्या दिसत नसल्याने आजवर साठवून ठेवलेले बरेच सोयाबीन आता विक्रीसाठी येऊ लागले आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Akola News : सोयाबीन दरवाढीची शक्यता सध्या दिसत नसल्याने आजवर साठवून ठेवलेले बरेच सोयाबीन आता विक्रीसाठी येऊ लागले आहे. यामुळे बाजार समित्यांत सोयाबीन आवकेत वाढ दिसून येत आहे.

अकोल्यात गुरुवारी (ता. ७) तब्बल चार हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची विक्री झाली. सरासरी दर ४३०० रुपयांच्याही आत मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसी सोयाबीनला मागणी कमी असल्याचा सर्वाधिक फटका दरांना बसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

या हंगामातील सोयाबीनला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले दर मिळालेले नाहीत. निदान फेब्रुवारी-मार्चमध्ये दर वाढतील या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी, खेडा खरेदी करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. दरवाढ होण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने आता हा माल विक्रीसाठी बाहेर निघू लागला आहे.

Soybean Market
Soybean Market: सोयाबीन ५० रुपयांनी वाढले; सोयाबीनचे भाव तीन कारणांमुळे वाढू शकतात 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन डीओसीला मागणी कमी असल्याचा सर्वाधिक फटका दरांना बसतो आहे. दुसरीकडे शासनाने खाद्यतेलाची आयात खुली ठेवलेली आहे. परिणामी शासनाला तेलाचे दर नियंत्रणाखाली ठेवण्यात यश येत असले तरी सोयाबीन उत्पादकांचा तोटा वाढत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

विदर्भात सोयाबीनच्या दरांबाबत एक प्रमुख बाजारपेठ म्हणून अकोल्याची ओळख आहे. या ठिकाणी ४००० ते ४४०० दरम्यानच सोयाबीनचे दर मिळालेले आहेत. सध्या सोयाबीनचा किमान दर ४००० असून कमाल दर तर गुरुवारी ४२७० रुपये होता. या वर्षीच्या हंगामात अनियमित पाऊस व वातावरणाचा सोयाबीन उत्पादनाला फटका बसलेला आहे.

Soybean Market
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर

उत्पादन घटल्याने आधीच अनेकांना लावलेल्या खर्चाची जुळवाजुळव होताना दिसत नाही. काही भागात एकरी दोन ते तीन क्विंटलपासून उत्पादन आलेले आहे. तर सोयाबीनचा एकरी खर्च किमान १५ हजारांपेक्षा अधिक झाला होता. म्हणजेच आताच्या दरात सोयाबीन विकले तर एकरी दोन-तीन क्विंटल उत्पादकता आलेल्या शेतकऱ्यांना लागवड खर्चही काढणे कठीण बाब बनली आहे.

आवक आणखी वाढण्याची शक्यता

या वर्षात बाजार समित्यात सोयाबीनला काही ठिकाणी ४४०० रुपयांपर्यंत कमाल दर मिळालेला होता. तरी तो फारच कमी मालाला मिळाला. सर्वसाधारण दर ४००० ते ४३०० दरम्यानच शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. दर सातत्याने दबावात असून आता वाढीचा कल दिसून येत नसल्याने सोयाबीन विक्रीकडे कल वाढू लागलेला आहे. ही आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com