Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर

Soybean Rate : सोयाबीनचे भाव गेल्या दोन आठवड्यांपासून स्थिरावलेले आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ झाल्याने हेज फंड्स म्हणजेच सोयाबीन बाजारात येणारी गुंतवणूक कमी झाली आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News : सोयाबीनचे भाव गेल्या दोन आठवड्यांपासून स्थिरावलेले आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ झाल्याने हेज फंड्स म्हणजेच सोयाबीन बाजारात येणारी गुंतवणूक कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री वाढली. त्यामुळे भाव गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आले आहेत. याचा दबाव आपल्याही सोयाबीनवर दिसतो. देशातही सोयाबीनचा स्टॉक होताना दिसत नाही. त्यामुळे भावात जास्त तेजी-मंदी होताना दिसत नाही.

देशातील बाजारात सोयाबीनची आवक आजही टिकून आहे. रोज किमान दीड लाख क्विंटल सोयाबीनची आवक होत असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. यंदा देशातील उत्पादन कमी झाले तरी मागील हंगामातील सोयाबीन अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे आहे.

त्यामुळे बाजारातील पुरवठा जास्त असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. याचाही दबाव देशातील बाजारावर दिसून येत आहे. त्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचाही दबाव भावावर दिसून येत आहे. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ४३०० ते ४६०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव पडलेले आहेत. आधीच भाव कमी होते त्यात पुन्हा नरमाई आली. भारत सरकारने आयातशुल्कही कमी केले आहे. यामुळे तेलावरील दबाव कायम आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड स्वस्त झाल्याने देशातून निर्यात होणाऱ्या सोयापेंडलाही चांगला भाव मिळत नाही. आपली सोयापेंड नॉन जीएम असूनही पाहीजे त्या प्रमाणात प्रिमियम भाव मिळत नाही किंवा विक्रेत्यांकडून तेवढा प्रिमियम घेतला जात नाही. याचाही फटका आपल्या सोयाबीन उत्पादकांना बसत आहे.

Soybean
Soybean Market: सोयाबीन ५० रुपयांनी वाढले; सोयाबीनचे भाव तीन कारणांमुळे वाढू शकतात 

जागतिक बाजारात सोयाबीनचे भाव पडण्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे वाढलेला पुरवठा, दुसरे म्हणजे हेज फंड्सची वाढलेली विक्री. जागतिक सोयाबीन बाजारात निराशेचे वातावरण आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढला.

म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन वाढल्याचा अंदाज जगातील सर्वच महत्त्वाच्या संस्थांनी व्यक्त केला. जागतिक सोयाबीन उत्पादनात टॉपच्या तिन्ही देशांनी आपला दबदबा कायम ठेवला. ब्राझीलचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी होणार आहे. पण अर्जेंटिनात गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट उत्पादन घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ब्राझीलची निर्यात वाढली

ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना या तीन देशांचा एकूण जागतिक सोयाबीन उत्पादनात वाटा ८० टक्क्यांपर्यंत आहे. तर सोयाबीनचा मुख्य ग्राहक असलेल्या चीनचा वाटा केवळ ५ टक्के आहे. ब्राझीलने मागच्या हंगामात विक्रमी उत्पादन घेतले होते.

त्यामुळे ब्राझीलची सोयाबीन निर्यात २९ टक्क्यांनी वाढली. तर अमेरिकेची निर्यात १४ टक्क्यांनी घटली आहे. कारण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढल्याने भाव कमी होते. यामुळे निर्यात वाढली. अमेरिका आणि ब्राझीलच्या सोयाबीन निर्याताचा जागतिक निर्यातीत वाटा तब्बल ८० टक्के आहे.

Soybean
Soybean Seed Production : नागालँड राज्यामध्ये करणार सोयाबीन बीजोत्पादन

स्टॉकिस्ट सक्रिय नाहीत

बाझीलमध्ये यंदा गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन कमी राहणार असले तरी काढणी जोमात सुरू आहे. यामुळे बाजारात पुरवठा वाढत आहे. पुरवठा वाढल्याने सोयाबीनमध्ये फायदा दिसत नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील हेज फंड्स म्हणजे सोयाबीनच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या बाहेर पडत आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री वाढलेली दिसते. याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री वाढली

नुकत्याच संपलेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री आधीच्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढली. यामुळे सोयाबीन आणि सोयापेंडचा भाव गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला. सोयाबीन ११.३८ डॉलर प्रतिबुशेलवर होते. तर सोयापेंड ३२७ डॉलरवर आली. विक्री वाढल्याचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीन उत्पादनामुळे जागतिक सोयाबीन बाजाराचे गणित बिघडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com