
Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील द्राक्ष हंगाम मध्यान्हावर आला आहे. वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षामधील साखरेचे प्रमाण चांगले असल्याने गोडी वाढली आहे. यामुळे रसदार आणि गोड द्राक्षांची मागणी वाढली असून, मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे उपवास सोडण्यासाठी द्राक्षांची मागणी वाढल्याने दर देखील टिकून आहेत, अशी माहिती बाजार समितीमधील द्राक्षाचे आडतदार अरविंद मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले,‘‘ यंदा द्राक्षाचा आगाप हंगामात द्राक्षाची आवक कमी राहिली. तर मुख्य हंगाम उशिराने सुरू झाल्याने द्राक्ष हंगाम आणखी एक दीड महिना सुरू राहील असा अंदाज आहे. बाजार समितीमध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि सांगली भागातून विविध वाणांची आवक होत असते. यामध्ये सोनाका, सुपर सोनाका, थॉमसन, माणिकचमण, ताश ए गणेश, आणि जम्बो वाणांचा समावेश आहे.
सध्या सरासरी रोज १५ ते २० टन द्राक्षांची आवक होत असून, रविवारी ही आवक ३० टन एवढी असते. सध्या उन्हाचे प्रमाण चांगले असल्याने द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरली आहे. यामुळे द्राक्षांची गोडी वाढल्याने मागणी वाढली आहे. यामुळे दर टिकून आहेत. त्यातच रमजान महिन्यातील मुस्लीम बांधवांच्या उपवासामध्ये फळांचे प्रमाण अधिक असल्याने यात द्राक्षांचा मोठा समावेश असतो. यामुळे देखील मागणी वाढल्याने दर चांगले आहेत.’’
असे आहेत १० किलोचे दर
सुपर सोनाका ---- ४००-६००
सोनाका --- ४५०--- ६००
थॉमसन --- ४००-५००
माणिक चमण --- ४००-५००
ताश ए गणेश --- ४०० -६००
जम्बो (काळी) ७००-११००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.