Papaya Rate : अखेर पपईदराचा तिढा सुटला

पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते पपई पिकाला प्रतिकिलो दहा रुपये २५ पैशांप्रमाणे दर ठरविण्यात आला.
Papaya Rate
Papaya RateAgrowon

शहादा, जि. नंदुरबार : पपई उत्पादक (Papaya Farmer) शेतकरी व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते पपई पिकाला (Papaya Rate) प्रतिकिलो दहा रुपये २५ पैशांप्रमाणे दर ठरविण्यात आला. शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजार समितीत याबाबत बैठक झाली. बैठकीत दरांबाबत व्यापारी व शेतकरी यांच्यात तीन तास चर्चा झाली.

Papaya Rate
Papaya market : पपईचे दर सर्वसाधारण

फळबागायतदार शेतकरी संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी, जयनगर येथील भगवान पाटील, वरूळ कानडी येथील अशोक मंगा पाटील, कुढावद येथील अशोक पाटील, शहादा येथील खंडू-पाटील, वडछील येथील विठ्ठल पाटील, कुकडेल शहादा येथील अनिल पाटील, पुनाजी पाटील, पिंपळोद येथील अंबालाल पाटील, मामाच्या मोहिदा येथील जयप्रकाश रामदास पाटील आदी उपस्थित होते.

Papaya Rate
Papaya Processing : कच्च्या पपईपासून टुटीफ्रुटी कशी बनवायची?

व्यापाऱ्यांमध्ये सरताज हाजी, नाजीम हाजी, मुल्लाजी हाजी, फारूक हाजी यांच्यासह २० ते २५ व्यापारी बैठकीला उपस्थित होते. बैठक सुमारे तीन तास चालली. पपईला दिला जाणारा दरांवरून शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये बरीच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव देऊन व्यापारी अन्याय करत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत होते. व्यापारी मात्र दरवाढीस विरोध दर्शवत होते. शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम होते.

अभिजित पाटील व सभापती सुनील पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेऊन बैठकीत शेवटी प्रतिकिलो दहा रुपये २५ पैसे दर ठरविण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी व व्यापारी यांच्यात पपई, केळीला दिला जाणाऱ्या दरांवरून वाद होतात. ते कुठेतरी मिटले पाहिजेत, ही भावना शेतकऱ्यांची होती. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर दिलाच पाहिजे, अशी भूमिका दिसून आली.

‘व्हेरिफिकेशन’साठी कागदपत्रे

‘‘यापूर्वी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता परस्पर बैठक घेऊन पपईचे दर ठरविले; परंतु आता व्यापारी परस्पर कागदावर दर ठरविणार नाहीत. बैठकीतच निर्णय घेण्यात येईल. शेतकरी पण अहोरात्र काबाडकष्ट करतो. पपई खरेदीदार व्यापारी परराज्यांतील असल्याने यात फसवणूक होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्याला व्हेरिफिकेशन ओळखपत्रासाठी कागदपत्रे देण्यास संमती दर्शविली. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये संबंध चांगले राहतील,’’ असे अभिजित पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com