Watermelon Rate: कलिंगड दरावर दबाव कायम; दर ७ ते ९ रुपयांच्या दरम्यान

Khandesh Market Update: खानदेशात कलिंगडाची आवक कमी असूनही परराज्यात मागणी घटल्यामुळे दरावर मोठा दबाव आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही, ही चिंताजनक बाब ठरत आहे.
Watermelon Farming
Watermelon FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात कलिंगडाची आवक कमी आहे. परंतु गुणवत्तेचा मुद्दा व परराज्यातील कमी मागणी यामुळे दरावर दबाव वाढला आहे. गेल्या १८ ते २० दिवसांत दरात किलोमागे दोन रुपयांची घसरण झाली आहे. सध्या जागेवर किंवा शिवार खरेदीत प्रतिकिलो सहा ते नऊ रुपये दर मिळत आहे.

खानदेशात यंदा कलिंगडाची लागवड वाढली होती. ही लागवड सुमारे सात हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे साडेचार हजार हेक्टर एवढी होती. तसेच धुळे व नंदुरबारातही लागवडीत मोठी वाढ यंदा झाली होती. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, रावेर, जळगाव भागांत अधिकची लागवड झाली होती. धुळ्यात शिरपूर, धुळे आणि नंदुरबारात शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांत अधिकची लागवड झाली होती.

Watermelon Farming
Watermelon Production : खानदेशात कलिंगड हंगामास फटका लागवड राहिली अधिक

कलिंगडाची काढणी खानदेशात फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाली. एप्रिलमध्ये काढणीचा हंगाम वेगात सुरू होता. रमझानच्या काळातही दर कमी होते. प्रतिकिलो सात ते आठ रुपये दर जागेवरच रमझानच्या कालावधीत शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु एप्रिलमध्ये मागणी कमी होत गेली. खानदेशातून गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, मध्य प्रदेशातील इंदूर, बऱ्हाणपूर यांसोबत उत्तर भारतातही कलिंगडाची पाठवणूक सुरू होती

Watermelon Farming
Watermelon Price Drop: पांढरकवडा तालुक्यात कलिंगडदर दबावात

मागणी बऱ्यापैकी होती. परंतु एप्रिलच्या अखेरीस दर सहा ते सात रुपये प्रतिकिलो, असे झाले. परराज्यातील कमी मागणी असल्याने दरावर दबाव वाढू लागला. एप्रिलच्या मध्यात दर जागेवर प्रतिकिलो पाच ते सहा रुपये, असे झाले. तर गेल्या आठ ते १० दिवसांपासून दर प्रतिकिलो सहा ते नऊ रुपये, असे मिळत आहेत. कलिंगडाची आवक जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर, यावल, जामनेरात बऱ्यापैकी होती. तर धुळ्यातील शिरपुरातही चांगली आवक होती. मार्च, एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी ७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) कलिंगडाची आवक झाली.

किमान दर १० रुपये मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

सध्या ११ ट्रक एवढी आवक जळगाव, धुळ्यात रोज होत आहे. आवक कमी असली तरी दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कलिंगडाला खर्चही अधिक लागतो. बियाणे, किडनाशके, विद्राव्य खतांची अधिक गरज असते. यामुळे दरही किमान १० रुपये मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्य\क्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com