Papaya Seedlings Price: खानदेशात पपई रोपांचे दर स्थिर

Papaya Variety: खानदेशात पपई लागवडीचा हंगाम संपल्यामुळे सध्या रोपांची मागणी घटली असली तरी दर स्थिर आहेत. ‘१५ नंबर’ वाण अधिक मागणीला असून, ‘७८६’ वाणावर रोगराईमुळे शेतकरी नाराज आहेत.
Papaya Sapling
Papaya SaplingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात पपई रोपांचा पुरवठा सध्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत आगाप पपई लागवड झाली आहे. सध्या पपई लागवड कमी किंवा हवी तेवढी नसल्याने पपई रोपांची मागणी, उठाव कमी असून, पपई रोपांचे दर मात्र स्थिर आहेत.

काही भागात शेतकरी उशिराची लागवड करीत आहेत. पपई रोपांचे वेगवेगळे दर यंदा होते. लागवड नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झाली. पपई रोपांचे दर नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत प्रति रोप १३ ते १७ रुपये, या दरात जागेवर किंवा पोहोच शेतकऱ्यांना मिळत होते. अनेक पपई रोपे निर्मात्यांनी रोपांच्या दरात वाढ केली.

Papaya Sapling
Papaya Plant Price: पपई रोपांच्या दरात घसरण

कारण ऑक्टोबरमध्ये पपईला जागेवर किंवा शिवार खरेदीत ३० ते ३२ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. नोव्हेंबरमध्येही जागेवर २८ ते २२ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. यामुळे आगाप पपई लागवडीकडे या कालावधीत अनेकांचा ओढा होता. आगाप पपई लागवड खानदेशात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. तर हंगामी लागवड फेब्रुवारीनंतर मे अखेरपर्यंत सुरू असते.

Papaya Sapling
Papaya Harvesting : पपई पिकात ऑगस्टमध्ये काढणी शक्य; क्षेत्र वाढले

सध्या १५ नंबर वाणाच्या पपई रोपांचे दर नऊ ते १० रुपये आहेत. या रोपांची मागणी अधिक आहे. कारण १५ नंबर वाणाच्या पपई पिकात रोगराई कमी असते. उत्पादनही बरे येते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. १५ नंबर वाणाच्या पपई रोपांचा पुरवठा धाराशीव, जालना, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व जळगाव, धुळे जिल्ह्यांतील विविध रोपवाटिका चालक करीत आहेत.

रोगराईमुळे एका वाणास कमी मागणी

पपईच्या ७८६ वाणाच्या रोपांनाही उठाव आहे. पण तुलनेत या वाणाची लागवड कमी होताना दिसत आहे. कारण या वाणावर रोगराई अधिक असते. या वाणात उत्पादन चांगले येते, पण रोगराईमुळे खर्च अधिक असतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पपईखालील क्षेत्र खानदेशात यंदा वाढले आहे. यामुळे पपई रोपांची मागणी मे अखेरपर्यंत होती. परंतु लागवडी आटोपल्याने मागणी कमी झाली, पण सध्या राज्यात अन्य भागात लागवडी सुरू असल्याने पपई रोपांचे दर मात्र स्थिर आहेत, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com