
Jalgaon News : खानदेशात पपईची लागवड आटोपली असून, एकट्या शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात सुमारे चार हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली आहे. तीन्ही जिल्ह्यांत एकूण आठ हजार हेक्टरवर लागवड झाली असून, पपईखालील क्षेत्र यंदा काहीसे वाढले आहे. यंदा लागवड नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही झाली आहे.
आगाप किंवा नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या पपई पिकातून काढणी ऑगस्टमध्येच सुरू होईल, असे दिसत आहे. ज्यांची शेती मुख्य रस्त्यांवर, पक्क्या रस्त्यांनजीक आहे, त्यांनी यंदा ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबरमध्ये पपई लागवड केली आहे. तसेच जानेवारी व फेब्रुवारीमध्ये लागवड झाली आहे. आगाप लागवडीच्या बागा जोमात आहेत.
त्यात पावसाळ्याच्या मध्यानंतर काढणी सुरू होईल. गणपती, नवरात्रोत्सवात या बागांत काढणीला गती येईल, असे दिसत आहे. पपईतील काढणी काही भागांत किंवा शहादा, चोपडा तालुक्यात सप्टेंबरमध्ये अनेक भागांत सुरू होईल, असे दिसत आहे. पपईसाठी खानदेशातील नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध आहे. नियमित लागवड फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाली. अनेक शेतकऱ्यांनी पपईत कलिंगडाचे आंतरपीक घेतले आहे.
पपईच्या रोपांचे दर यंदा वेगवेगळे होते. त्यात अधिकचा खर्च शेतकऱ्यांना लागला आहे. प्रतिरोप नऊ ते ११ रुपये, असे दर विविध भागांत होते. नंदुरबारमध्ये सुमारे पाच हजार हेक्टरवर, धुळ्यात १२०० हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे २२०० हेक्टरवर लागवड झाली आहे. नंदुरबार गेली तीन वर्षे पपई लागवडीत आघाडीवर राहिला आहे.
पण नंदुरबारमधील लागवड यंदा पुन्हा पाच हजार हेक्टरपर्यंत आली आहे. धुळ्यात शिरपूर व शिंदखेडा भागात अधिक लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर व इतर भागांत लागवड झाली आहे. पपईचे दर गेल्या हंगामात कमाल ३४ व किमान नऊ रुपये प्रति किलो, असे मिळाले.
दर बरे होते. तसेच पावसात मोठे नुकसानही शेतकऱ्यांना सहन करावे लागले. अनेक शेतकऱ्यांच्या पपई बागा विविध विषाणूजन्य रोगाने नोव्हेंबरमध्येच काढून फेकाव्या लागल्या. पपई पिकासाठी गादीवाफे, ठिबक तंत्रज्ञानाचा अवलंब अनेक पपई उत्पादकांनी केला आहे. क्रॉप कव्हरचा उपयोगही शेतकऱ्यांनी केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.