
Amaravati News: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत पपई फायदेशीर पीक ठरत असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाचे आहे. सद्यःस्थितीत पाच जिल्ह्यांत पपईखालील क्षेत्र सुमारे ८४२ हेक्टरवर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अमरावती बाजारात सध्या पपईला २००० ते २५०० रुपये क्विंटलला दर मिळत आहे.
अमरावती फळ व बाजार समितीत पपईची आवक ७० ते १०० क्विंटलच्या घरात आहे. यवतमाळ व लगतच्या काही जिल्ह्यांतून ही आवक होत असल्याचे सांगण्यात येते. सध्या आवक होणाऱ्या तायवान पपईचे दर २००० ते २५०० रुपये क्विंटलवर स्थिरावले आहेत. रविवारी (ता.२) अमरावती बाजारात पपईची २७० क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. यादिवशी १५०० ते २००० रुपयांचा दर होता.
सोमवारी (ता.३) पपईची आवक कमी होत १९० क्विंटलवर घसरली. आवक कमी झाल्यामुळे दरात सुधारणा होत १६०० ते २२०० रुपये क्विंटलवर दर पोहचले. मंगळवारी (ता.४) १८०० ते २२०० रुपये असा दर पपईला मिळाला, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. नागपूरच्या कळमना बाजार समितीत देखील पपईची आवक होत असून ती अवघी वीस क्विंटल इतकी आहे. या बाजारात पपईचे दर १००० ते १५०० रुपये असे होते.
वाशीम जिल्ह्याच्या वनोजा भागात गेल्या अनेक वर्षांपासून पपई लागवडीत सातत्य आहे. एकरी ९०० रोपे लागतात. परंतु मर्तुकीच्या शक्यतेने एकराकरीता एक हजार रोपे आणली जातात. यंदाच्या हंगामासाठी सोलापूर परिसरातील रोपवाटिकाधारकांकडून ४० हजार रोपांची खरेदी करण्यात आली आहे. १६ रुपये पोहच असा दर आकारण्यात आला. रोपवाटिकाधारकाकडून १५ मार्चला पुरवठा होईल. लांब आकाराच्या पपईला ग्राहकांची मागणी असते. गोल आकाराच्या फळांना अपेक्षित वजन मिळत नाही, असा देखील समज शेतकऱ्यांमध्ये आहे, अशी माहिती मंगरूळपीर (वाशीम) तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी दिली.
अमरावती विभागातील जिल्हानिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अकोला १४२
अमरावती १३७.८
बुलडाणा १५९.५
वाशीम २७५
यवतमाळ ११४
एकूण ८२८.३०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.