Sitrang Cyclone : चक्रीवादळामुळे भाताच्या भावात पाच टक्के वाढ

बांगलादेशमध्ये सितरंग चक्रीवादळाने कहर माजवल्यानंतर ते आता जमिनीवर धडकलं आहे. शेजारच्या प. बंगालमध्ये भात पिकाची काढणी सुरू असल्याने या वादळाचा फटका बसेल की काय, अशी चिंता आहे.
Paddy Rate
Paddy RateAgrowon

बांगलादेशात सितरंग चक्रीवादळाने (Sitarang Cyclone) धुमाकूळ घातलाय. हे वादळ भारतात दाखल झालं नसलं तरी, बंगालच्या किनारपट्टीच्या प्रदेशांना याचा फटका बसला आहे. आसाममध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain Assam) झाला आहे. प. बंगालमध्ये सध्या भाताच्या पिकाची काढणी (Paddy Harvesting) सुरू आहे. या वादळामुळे राज्यातील भातपिकाचं नुकसान (Paddy Crop Damage) होईल, या भीतीमुळे दरावर परिणाम झाला आहे. बाजारात तांदळाचे दर (Rice Rate) पाच टक्क्यांनी वाढले आहेत.

Paddy Rate
Paddy Crop : देशात भात उत्पादन घटलं

बांगलादेशमध्ये सितरंग चक्रीवादळाने कहर माजवल्यानंतर ते आता जमिनीवर धडकलं आहे. शेजारच्या प. बंगालमध्ये भात पिकाची काढणी सुरू असल्याने या वादळाचा फटका बसेल की काय, अशी चिंता आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याच्या भीतीने दर वाढले आहेत.

Paddy Rate
Paddy Harvesting : भात कापणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील भात पिकांचं नुकसान होईल या भीतीने तांदळाच्या किमती पाच टक्के वाढल्या आहेत. मात्र या चक्रीवादळामुळे अद्याप तरी पिकांचं मोठं नुकसान झालेलं नसल्याचं तांदूळ विपणन आणि निर्यात कंपनी राईस व्हिलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज अग्रवाल यांनी सांगितलं. पण देशाच्या इतर भागातून जोपर्यंत नवं पीक येत नाही तोपर्यंत हे दर खाली उतरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पुढच्या पंधरवड्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातून नवं पीक यायला सुरुवात झाल्यावर किंमती १० टक्के कमी होणे अपेक्षित आहे. तसेच अवकाळी पावसामुळे यंदा तांदळाचं उत्पादन २०२१ च्या तुलनेत कमी असण्याची अपेक्षा आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ उत्पादन सहा टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com