
Gondia News : धानाच्या उत्पादकता खर्चात सातत्याने वाढ होत असताना गेल्या २१ वर्षांत हमीभावात अवघी १७५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही पीक पद्धती आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे.\
हमखास पावसाचे जिल्हे असलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूरचा काही भाग यामध्ये धानाचे उत्पादन होते. या पाच जिल्ह्यांतील सरासरी लागवड क्षेत्र हे १७ लाख हेक्टरच्या घरात आहे. गोंदिया तसेच भंडारा जिल्हे हे धानप्रवण आहेत. त्यामुळेच या जिल्ह्यांना अनुक्रमे राइस सिटी तसेच धानाचे कोठार म्हणून ही ओळखले जाते.
सन २००४ ते २०२५ पर्यंत धानाचे हमीभाव पाहिल्यास त्यात केवळ १७५० रुपयांची वाढ झाली आहे. पण त्या तुलनेत लागवड खर्चात मात्र पाच पट वाढ झाल्याचा दावा शेतकरी करतात. खते, बियाणे, मजुरी खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. वीस वर्षांपूर्वी धानाच्या शेतीचा एकरी लागवड खर्च १२ ते १३ हजार रुपये होता. या खर्चात आता वाढ होत तो २३ ते २५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. पण त्या तुलनेत हमीभावात तुटपुंजी वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
ताळेबंद जुळता जुळेना
धानाचा एकरी उत्पादकता खर्च २३ ते २५ हजार रुपये आहे. एकरी १६ ते १८ क्विंटलची उत्पादकता होते. धानाच्या विक्रीअंती शेतकऱ्यांच्या हातात तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
यंदा ४७८३ रुपयांची शिफारस
२०२५-२६ या वर्षाकरिता कृषिमूल्य आयोगाकडून केंद्र सरकारला धानाच्या ४७८३ रुपयांची हमीभाव शिफारस करण्यात आली आहे. शिफारस अधिक असली तरी केंद्राकडून यंदा किती हमीभाव दिला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२१ वर्षांतील धानाचे हमीभाव
२००३-०४ ः ५५०
२००४-०५ ः ५६०
२००५-०६ ः ५७०
२००६-०७ ः ५८०
२००७-०८ ः ६४५
२००८-०९ ः ६८५
२००९-१० ः ९५०
२०१०-११ ः १०००
२०११-१२ ः १०८०
२०१२-१३ ः १२५०
२०१३-१४ ः १३१०
२०१४-१५ ः १३६०
२०१५-१६ ः १४१०
२०१६-१७ ः १४७०
२०१७-१८ ः १५५०
२०१८-१९ ः १७५०
२०१९-२० ः १८१५
२०२०-२१ ः १८६८
२०२१-२२ ः १९४०
२०२२-२३ ः २१४०
२०२३-२४ ः २१८३
२०२४-२५ ः २३००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.