Paddy MSP : भाताला २,३०० रुपये हमीभाव

Paddy Crop : खरीप हंगामातील भात खरेदी लवकरच राज्य सरकारकडून सुरू होईल; परंतु शेतकऱ्यांमध्ये भाताची विक्री करण्यात फारसा उत्साह दिसत नाही.
Paddy
Paddy Agrowon
Published on
Updated on

Alibaug News : खरीप हंगामातील भात खरेदी लवकरच राज्य सरकारकडून सुरू होईल; परंतु शेतकऱ्यांमध्ये भाताची विक्री करण्यात फारसा उत्साह दिसत नाही. यंदा सर्वसाधारण ११७ रुपये हमीभाव वाढवण्यात आला आहे. गतवर्षी भाताला २,१८३ रुपये भाव देण्यात आला होता. यंदा दोन हजार ३०० रुपये देण्यात आला आहे.

जिल्ह्यात २८ भात खरेदी-विक्री केंद्रांना मार्केटिंग फेडरेशनकडून परवानग्या मागवण्यात आल्या आहेत. यात आणखी आठ केंद्रांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रस्‍ताव तयार करण्यात आला आहे.

लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भात खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. पिकामध्ये पाण्याची आर्द्रता कायम असल्याने काही दिवस पीक उन्हामध्ये सुकावे लागणार आहे. याचदरम्यान या २८ भात खरेदी-विक्री केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.

Paddy
Paddy Threshing : भातझोडणीला ताडपत्रीचा आधार

गतवर्षी असमाधानकारक पाऊस असतानाही जिल्ह्यात खरिपासाठी सहा लाख ५१ हजार क्विंटल भातपिकाची विक्री शेतकऱ्यांनी केली होती. यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस पडल्याने भाताचा उतारा चांगला होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात टप्प्याटप्प्याने रायगड जिल्ह्यात २८ भात खरेदी केंद्रे करण्यात येणार आहे. या केंद्रांवर सर्वसाधारण भात दोन हजार ३०० रुपये किमतीला विकता येणार आहे.

Paddy
Paddy Harvesting : पालीमध्ये शेतकरी कुटुंबे रमली भातकापणीत

‘अ’ दर्जासाठी वाढीव २० रुपये

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रती क्विंटल दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यात ‘अ’ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण २० रुपयांचा फरक असणार आहे. तसेच, यावर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कमदेखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे.

उत्पादन खर्च कमीत कमी करण्यासाठी झोडणीनंतर धान घरी न आणता तो परस्पर विकण्याचा प्रयत्न असतो. यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. हलवा जातीचे भातपीक तयार झालेले आहे. काही दिवसांत खलाटकरांची कापणी सुरू होईल, यादरम्यान भाताची उचल होणे गरजेचे आहे.
- शांताराम पाटील, प्रयोगशील शेतकरी, अलिबाग
खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश शासनाकडून अद्याप प्राप्त झाले आहेत. पुढील काही दिवसांत जीआर निघेल त्यानुसार विक्रीसाठी पाठवलेल्या भाताची आर्द्रता किती असावी, वाहतूक, विक्री पद्धत यासंदर्भातील माहिती सहकारी संस्थांना देण्यात येईल. रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारण २८ भात खरेदी केंद्रे सुरू केले जातात, यावर्षीही तितकेच सुरू होतील. शेतकऱ्यांना वाहतूक करणे सोयीचे होईल, अशाच मध्यवर्ती ठिकाणी असतील.
- के. टी. ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com