
Nashik News: मागील सप्ताहात राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारात लेट खरीप कांद्याची आवक घटल्याने कांदा दरात सुधारणा होती. तर चालू सप्ताहात पुन्हा आवक वाढल्याने दर पुन्हा घसरले आहेत. मागील सप्ताहात शनिवारी (ता.१५) सरासरी ३,००० रुपये क्विंटल होते. हेच दर टप्प्याटप्प्याने कमी होऊन शुक्रवारी (ता.२२) प्रति क्विंटल २,३२५ रुपये दर मिळाले.
राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लेट खरीप कांद्याला किमान २०० रुपयांपासून, कमाल ३,४०० रुपयांपर्यंत, तर सरासरी २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा दिसून आली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने दुसऱ्या सप्ताहात दर ३,००० रुपयांवर गेले होते.
आता तिसऱ्या सप्ताहात लेट खरीपसोबत रब्बी उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याची उपलब्धता वाढू लागली आहे. त्यामुळे आवक पुन्हा वाढल्याने क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांपर्यंत घसरण झाल्याचे चित्र आहे. मात्र लेट खरीप व नव्या रब्बी उन्हाळ कांद्याचे दर सारखेच आहे.
गत खरीप, तर आता लेट खरीप व रब्बी उन्हाळ कांदा असे तीनही हंगाम यंदा अतिवृष्टी व मान्सूनोत्तर पावसामुळे अडचणीत सापडले. लागवडी लांबणीवर गेल्या. तर काढणीपश्चात कांद्याची आवक उशिराने बाजारात आली. त्यात बाजारात आवक कमी-जास्त होताना दिसून आली. स्थानिक बाजारात व देशांतर्गत पुरवठा सुरळीत होत असल्याने आता निर्यातवाढ होण्यासाठी सरकारने हस्तक्षेप कमी करून अनुकूल धोरणे हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे अभ्यासू शेतकरी व निर्यातदारांचे मत आहे.
नाशिकसह सोलापूर, नगर, पुणे भागांत आवक वाढली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका सोसावा लागत आहेत. त्यातच एकरी उत्पादनात घट झाल्याने व प्रतवारी दुय्यम असल्याने अडचणी आहेत. त्यातच मध्य प्रदेश, गुजरात राजस्थान या भागांतील आवक मंदावल्याने दर वाढले होते. तर आता सोलापूर, पुणे, नगर भागांतील कांदा पट्ट्यात नवीन रब्बी कांद्याच्या आवकेत सुधारणा आहे. नाशिक भागात लेट खरीप कांद्याची, तर इतर भागात वाढलेली उन्हाळ कांद्याच्या आवक यामुळे दर कमी झाले आहेत.
राज्यातील प्रमुख बाजारातील स्थिती: (ता.२१ फेब्रुवारी २०२५)
बाजार समिती...किमान...कमाल...सरासरी...
सोलापूर...२७,८२०...२००...३,४००...१,८००
लासलगाव...१९,९९८...९००...२,८५५...२,३२५
विंचूर(लासलगाव)...८,४००...१,०००...२,६२०...२,३००
पिंपळगाव बसवंत...२०,४२०...६००...२,९४०...२,१७५
चांदवड...१४,७५०...१,२००...२,४९८...२,१८०
संगमनेर...१२,११५...४००...३,०००...१,७००
पुणे...२१,०२२...१,५००...२,७००...२,१००
(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणान मंडळ)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.