Onion Cultivation : वैजापुरात १८ हजार ५०० हेक्टरवर कांदा लागवड

Onion Cultivation : गतवर्षीच्या रब्बी हंगामात वैजापूर तालुक्यात कांद्याची सुमारे १६ हजार ५०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती.
Onion Cultivation
Onion CultivatuonAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : गतवर्षीच्या तुलनेत वैजापूर तालुक्यात कांद्याचे क्षेत्र सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त वाढले आहे. कांदा चाळ, बाजारात आवक विषयी सजग शेतकरी, दरातील सातत्य, इतर पिकाच्या तुलनेत कांद्याने काही तरी देऊन जाणे यामुळे तालुक्यात क्षेत्र वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात.

गतवर्षीच्या रब्बी हंगामात वैजापूर तालुक्यात कांद्याची सुमारे १६ हजार ५०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यंदा रब्बीतील कांद्याची लागवड १८ हजार ५०० हेक्टरवर पोहोचली आहे. लागवड करताना शेतकरी साडेतीन फुटाच्या बेड पद्धतीने तसेच पूर्वहंगामी उसामध्ये व सुधारित पेरणी यंत्राच्या साह्याने कांदा लागवडीला प्राधान्य देत असल्याची स्थिती आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा क्षेत्र वाढले

उत्पादन खर्च वाढल्याने अलीकडच्या काळात सुमारे ५० ते ६० हजारापर्यंत एकरी खर्च शेतकऱ्यांना येतो आहे. सरासरी १५० क्विंटलपर्यंत शेतकरी एकरी उत्पादन काढतात. अर्थात, याला हवामानाची प्रतिकूलता अपवाद असू शकते. तालुक्यात सुमारे ४५०० कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत.

Onion Cultivation
Onion Cultivation : कांदा लागवडीसाठी यंदा वीस टक्के खर्च वाढला ; मजुराची टंचाई; शेतकऱ्यांचा अडचणीतून मार्ग

साधारणतः नऊ महिन्यांपर्यंत या कांदा चाळीमध्ये कांदा साठवून शेतकऱ्यांना त्याची टप्प्याटप्प्याने विक्री करणे शक्य होते. त्यामुळे सजग शेतकरी बाजारात जास्तीची आवक होणार नाही याचा अंदाज घेऊन कांदा विक्रीसाठी नेण्याचे नियोजन करत आहेत.

अलीकडे १००० ते २४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांद्याला दर मिळतो आहे. इतर पिकांच्या तुलनेत कांदा शेतकऱ्यांना काहीतरी देऊनच जात असल्याने अलीकडे कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

कांदा चाळीला वाढवावे अनुदान

माहितीनुसार, कांदा चाळीला २५ टन क्षमतेसाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते. मुळात ती कांदा चा उभारणीसाठी किमान अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी मिळणारे अनुदान वाढविल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा चाळी उभ्या करतील. त्याचा फायदा बाजाराचा अंदाज घेऊन टप्प्याने कांदा बाजारात आणण्याला प्राधान्य देण्यासाठी होऊ शकतो असे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी सुमारे पाच एकर पर्यंत कांदा करतो यंदा मात्र कांद्याचे क्षेत्र बटाईचा धरून सात एकरावर नेले आहे. दराला मिळणारे सातत्य व इतर पिकाच्या तुलनेत कांदा काहीतरी देऊन जात असल्याने क्षेत्र वाढीचा निर्णय घेतला.
चंद्रशेखर साळुंके, कांदा उत्पादक, घायगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.
रब्बी कांदा हा चाळीमध्ये साठवणूक करता येतो तसेच योग्य बाजार भाव मिळाल्यास विक्री करता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला पसंती दिली आहे.
रवी उराडे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वैजापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com