Onion Market : लासलगावी लेट खरीप कांदा तीन हजार रुपयांवर

Onion Rate : अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप व लेट खरिपातील कांदा हंगाम प्रभावित झाला. रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीही लांबणीवर गेल्या.
Onion Rate
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप व लेट खरिपातील कांदा हंगाम प्रभावित झाला. रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीही लांबणीवर गेल्या. खरिपानंतर लेट खरीप कांद्याची आवक उशिराने आली. मात्र ही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आवक टप्प्याटप्प्याने कमी झाल्याचे चित्र आहे.

दरात सुधारणा झाली असून, कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लेट खरीप कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दर मिळाला आहे. यंदा खरीप कांद्याच्या लागवडी बाधित झाल्याने नवीन खरीप कांद्याची आवक नोव्हेंबरपासून अत्यंत कमी प्रमाणावर सुरुवात झाली. त्याची प्रतवारी सर्वसाधारण होती. त्यातच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने लागवडी खराब झाल्या. तर काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम दिसून आला.

Onion Rate
Onion Market : कांदा खरेदीतील गैरव्यवहार ; १५ महासंघांवरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

राज्यातील सर्वच प्रमुख बाजार आवारामध्ये सध्या आवक कमी झाले आहे. यापूर्वी नवीन खरीप कांद्याला प्रतिक्विंटल ४,००० रुपयांपर्यंत दर मिळाला. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून लेट खरीप कांद्याची आवक वाढून जानेवारीअखेरपर्यंत ती टिकून होती. त्याची प्रतिक्विंटल १,५०० ते २,७०० दरम्यान कांद्याची विक्री विक्री झाली. मात्र आता पुन्हा आवक घटल्याने दरात पुन्हा सुधारणा झाली आहे.

...असे राहिले खरीप आणि लेट खरीप कांद्याचे दर

महिना...किमान... कमाल...सरासरी

ऑक्टोबर...९०१...३,८५२...२,८६७

नोव्हेंबर...१,०००...५,८७१...४,१०१

डिसेंबर...७००..५,६४१..२,७९०

जानेवारी...१,०००...२,६५२...२,२५०

(संदर्भ : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)

Onion Rate
Onion Market : कांदा वितरण प्रकरणात ‘नाफेड’कडून गोवा महासंघाची नाहक बदनामी

राज्यातील प्रमुख बाजारातील स्थिती : (ता. १५ फेब्रुवारी २५)

बाजार समिती...किमान...कमाल...सरासरी...

सोलापूर...२५,७२७...४००...४,३००...२,१००

लासलगाव...११,९३०...१,२००...३,४८१...३,०००

विंचूर (लासलगाव)...८,४४५...१,३००...३,३००...२,९००

पिंपळगाव बसवंत...१६,१५०...१,०००...३,५०७...२,९५०

चांदवड...१०,२००...१,७००...३,५५१...२,९००

येवला...७,०००...८५०...३,२५०...२,६५०

घोडेगाव (नेवासा)...७९३१...१५००...३३००..२८००

दरवाढीची कारणे :

- एकरी उत्पादनात घट व प्रतवारीवर परिणाम.

- मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान भागातील आवक मंदावली.

- सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील कांदा पट्ट्यात नवीन रब्बी कांद्याची आवक तुलनेत कमी.

- मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने पुरवठा मर्यादित.

- देशातील बाजारपेठांमध्ये मागणी वाढल्याने दरात सुधारणा.

बाजार समिती आवारात लेट खरीप कांद्याची १,७०० ते १,८०० वाहनांतून आवक होत होती. मात्र ती आता एक हजाराच्या आत आली आहे. सरासरीच्या तुलनेत आवक ही कमी झाल्याचे एकंदरीत चित्र आहे.
- नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा लागवडी प्रभावित झाल्या. परिणामी, आवकेवरही परिणाम दिसून आला. सध्या लेट खरीप कांद्याची आवक कमी होऊन दरात सुधारणा आहे. मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत आहेत. उन्हाळ कांद्याची आवक सुधारल्यानंतर मात्र दर स्थिर होतील.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com