Edible Oil Market : खाद्यतेलाचे दर पडल्याने तेलबिया उत्पादक संकटात

यंदा सोयाबीन बाजाराला सोयापेंड दराने आधार दिला. पण सोयातेलाकडून निराशा झाली. सोयातेलाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासून दबावात आले.
Edible Oil
Edible OilAgrowon
Published on
Updated on

Edible Oil Market Update यंदा सोयाबीन (Soybean) बाजाराला सोयापेंड दराने आधार दिला. पण सोयातेलाकडून निराशा झाली. सोयातेलाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासून दबावात आले. केवळ सोयातेलच नाही तर सूर्यफूल (Sunflower) आणि मोहरी तेलाच्या (Mustard Oil) दरात मोठी घट झाली.

मागील दोन आठवड्यांचाच विचार केला तर सर्वच खाद्यतेलांचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. पण याचा ना ग्राहकांना ना उत्पादकांना अशी स्थिती आहे. उलट मोहरी आणि सोयाबीन उत्पादकांना याचा फटका बसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील घाऊक बाजारात ज्या प्रमाणात तेलाचे भाव कमी झाले, त्या प्रमाणात ग्राहकांसाठी भाव कमी केले गेले नाहीत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव मात्र उद्योगांनी कमी केल्याची स्थिती आहे.

खाद्यतेल आयात स्वस्त होऊनही ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पण आयात स्वस्त झाल्याचा फटका सोयाबीन आणि मोहरी उत्पादकांना बसत आहे. सोयाबीनचे भाव दबावात आहेत. तर मोहरीच्या दराने हमीभावाचाही टप्पा गाठला नाही. शेतकऱ्यांना आजही दरवाढीची अपेक्षा आहे.

Edible Oil
Oil Seed Sowing : परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यात उन्हाळी तेलबिया पिकांचा वाढला पेरा

मागील दोन आठवड्यांमध्ये खाद्यतेलाचे भाव ५०० ते ७०० रुपयांनी कमी झाले. पण तेल विक्रेत्यांनी दर कमी केले नाहीत. त्यामुळे सरकारने नाराजी व्यक्त केली. सरकारने ‘सॉल्व्हेंट एक्‍स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एसईए’ला आपल्या सदस्यांना दर कमी करण्यास सांगावे, असे सुचवले. ‘एसईए’च्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाले तसे देशातही दर कमी होत आहेत.

पामोलिनचे भाव क्विंटलमागे ३५० रुपयांनी कमी झाले. तर सरकी तेल ५५० रुपयांनी स्वस्त झाले. भुईमूग तेलाचेही भाव ५०० रुपयांनी घटले. सूर्यफूल तेलाच्या दरातही काही प्रमाणात नरमाई आली.

खाद्यतेलांमध्ये सर्वाधिक भाव घटले ते मोहरी आणि सोयाबीन तेलाचे. देशातील बाजारात शेतकऱ्यांची मोहरी येत आहे. यंदा उत्पादन चांगले झाल्याने देशातील उत्पादन वाढणार आहे. पण सराकरने आयातीलाही पायघड्या घातल्या. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Edible Oil
Edible Oil Update : देशात खाद्यतेलाची काय परिस्थिती आहे?

मोहरी तेलाच्या दरात सर्वाधिक घट

मोहरी तेलाचे भाव क्विंटलमागे ६५० रुपयांनी कमी झाले. २१ एप्रिल रोजी १०४० रुपयांवर असलेले मोहरीचे तेल आता ९७५ रुपये प्रतिक्विंटलने मिळत आहे. मागच्या वर्षी हेच भाव १५५० रुपयांवर होते. शेतकऱ्यांची मोहरी बाजारात आल्यानंतरच दरात मोठी घट झाली. याचा परिणाम म्हणजे मोहरीचे दर आजही हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी आहेत.

सोयातेलात पुन्हा घसरण

सोयाबीन तेलाचे भावही मागील दोन आठवड्यांत क्विंटलमागे ६०० रुपयांनी कमी झाले. २१ एप्रिल रोजी सोयातेलाचे भाव प्रतिक्विंटल १०३५ रुपयांवर होते. ते सध्या ९७५ रुपयांवर आहेत. पण मागील वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन तेलाने १६५० रुपयांचा टप्पा गाठला होता. म्हणजेच सध्याचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे ६७५ रुपयांनी कमी आहेत.

आयातशुल्क वाढीची मागणी

चालू हंगामात अगदी सुरुवातीपासूनच सोयाबीन तेलाचे भाव दबावात राहिले. पण सध्या हा दबाव खूपच वाढला. चालू हंगामात सोयाबीन दराला केवळ सोयापेंडचा आधार आहे. तेलाचे भाव कमी झाल्यामुळे सोयाबीन आणि मोहरीचे दर दबावात आले.

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे सरकारने आता खाद्यतेल आयातशुल्क वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com