Oil Seed Sowing : परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यात उन्हाळी तेलबिया पिकांचा वाढला पेरा

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा (२०२३) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता.३१) पर्यंत भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ या गळीतधान्यांची मिळून एकूण १४ हजार १२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Oil Seed
Oil SeedAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा (२०२३) उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता.३१) पर्यंत भुईमूग, सोयाबीन (Soybean), सूर्यफूल, तीळ या गळीतधान्यांची मिळून एकूण १४ हजार १२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

त्यात परभणी जिल्ह्यातील ५ हजार १५९ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यांतील ८ हजार ९६१ हेक्टरचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात गळीतधान्यांचे सरासरी क्षेत्र ९ हजार ४८२ हेक्टर आहे. यंदा मार्च अखेर पर्यंत ५ हजार १५९ हेक्टरवर (५४.४१ टक्के) पेरणी झाली.

त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी १ हजार ७१८ हेक्टर, सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ६६२ असताना यंदा ३ हजार ४३२ हेक्टरवर (१२८.९१ टक्के), तिळाची ११.२४ पैकी ८ हेक्टरवर (७१.१७ टक्के) पेरणी झाली आहे.

Oil Seed
Oil Seed : कृषी विद्यापीठ देणार दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन

भुईमूग, सोयाबीन या दोन पिकांचा सर्व तालुक्यात तर तिळाचा परभणी, जिंतूर तालुक्यात पेरा आहे. यंदा गळीतधान्यांचा पेरा परभणी, जिंतूर, पाथरी, पालम, पूर्णा या पाच तालुक्यात कमी झाला तर सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड या चार तालुक्यांत वाढला आहे.

परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र १० हजार ९५८ हेक्टर आहे. यंदा मार्च अखेर ६ हजार ५११ हेक्टरवर (५९.४२ टक्के)पेरणी झाली आहे.

हिंगोलीत गळीतधान्यांचे सरासरी क्षेत्र १४ हजार ८५६ हेक्टर आहे. यंदा मार्च अखेर ८ हजार ९६१ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३ पैकी ४ हजार २८२ हेक्टर (६६.०५ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ४ हजार ८७ हेक्टर (४८.७१ टक्के) पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय गळीतधान्ये पेरणी स्थिती

(हेक्टरमध्ये) (ता.३१ मार्च पर्यंत)

तालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी क्षेत्र- टक्केवारी

परभणी- ३०००- ७३२ - २४.४२

जिंतूर - ३८५१- १९८०- ५१.४१

सेलू - १३०- २३० - १६५.७४

मानवत- ४२६- ७४०- १७३.५२

पाथरी - २२४- १७७ - ७८.७९

सोनपेठ- २१०- २९३ - १३९.७९

गंगाखेड- ४४७- ७९५ - १७७.७२

पालम- ७३- २० - २७.१५

पूर्णा - ११९०- १९०- १७.१७

हिंगोली - १५१९ - ६०८- ४०.०२

वसमत - ७८९१ - ३७९७- ४८.१२

औढानागनाथ- १११२- १६२० - १४६.६८

सेनगाव - ३५००- २९३६- ८३.८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com