Orange Export : नागपुरी संत्रा आज जाणार मस्कतला

Mahaorange Update : चव आणि रंगासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाऑरेंजकडून होत आहे.
Orange
OrangeAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : चव आणि रंगासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाऑरेंजकडून होत आहे. त्याच प्रयत्नांतर्गत शनिवारी (ता. ७) ओमानची राजधानी मस्कत येथे नागपुरी संत्र्याची पहिल्यांदाच निर्यात केली जाणार आहे.

नागपुरी संत्र्याची टिकवणक्षमता कमी आहे. परिणामी, त्याच्या निर्यातीला देखील मर्यादा आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत या भागात संत्र्याची टिकवणक्षमता वाढीसाठी पूरक ठरणाऱ्या प्राथमिक प्रक्रिया केंद्राची संख्या वाढीस लागली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेत संत्रा फळांचे क्लिनिंग, ग्रेडिंग आणि त्यावर वॅक्‍स कोटिंग केले जाते.

Orange
Orange Farming : सिंचन, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

हा पर्याय टिकवणक्षमता काही अंशी वाढीस पूरक ठरणारा आहे. यापूर्वी संत्र्याची बांगलादेशला निर्यात होत होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तेथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, निर्यात उत्पादनांचा रोख परतावा मिळत नसल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे बांगलादेशला होणारी संत्रा निर्यात प्रभावित झाली आहे.

Orange
Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

त्याचा फटका बसत देशांतर्गत बाजारात संत्र्याचे दर दबावात आले आहेत. त्यामुळेच इतर देशाची बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. त्याच प्रयत्नातून खासगी निर्यातदाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच ओमानची राजधानी मस्कत येथे संत्रा निर्यात केली जाणार आहे. नागपूर विमानतळावरून शनिवारी (ता. ७) संत्र्याची १५०० किलोची पहिली खेप रवाना होणार आहे.

आखाती देशांमध्ये यापूर्वी निर्यातीचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आता विमानाच्या माध्यमातून १५०० किलो संत्र्याची निर्यात मस्कतला केली जाणार आहे. नागपुरी संत्र्याच्या निर्यातीला जागतिक बाजारपेठ मिळविण्यासाठी अशा प्रयत्नात सातत्य राखले जात आहे.
श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com