Orange Orchard
Orange OrchardAgrowon

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Fungal Diseases in Orchards : बुरशीजन्य रोगामुळे ३७ हजार हेक्‍टरवरील संत्रा फळांची गळती होऊनही शेतकऱ्यांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.
Published on

Amravati News : अतिवृष्टी, संततधार पावसामुळे नुकसान झाल्यानंतर इतर पिकांसाठी भरपाईची तरतूद आहे. त्याच वेळी संत्रा उत्पादकांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप आहे. आताही बुरशीजन्य रोगामुळे ३७ हजार हेक्‍टरवरील संत्रा फळांची गळती होऊनही शेतकऱ्यांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.

या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण याचा सर्वाधिक फटका संत्रा बागायतदारांना बसला. बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रा फळांची गळ झाली. थोडे थोडके नाही तर तब्बल ३६ हजार ८४१ हेक्‍टरवरील संत्रा बागा प्रभावित झाल्या.

Orange Orchard
Orange Disease : संत्रापट्ट्यात फळगळीची समस्या

याशिवाय ५४४ हेक्‍टर क्षेत्रावरील लिंबाचेही नुकसान झाले. त्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत प्रशासनाकडून सर्व्हेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ३६ हजार रुपये प्रति हेक्‍टर प्रमाणे १३४ कोटी ६२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्‍तांमार्फत शासनाकडे करण्यात आली.

Orange Orchard
Orange Sapling Rate : संत्रा कलमांचे दर कमी झाल्यामुळे आर्थिक फटका

विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. परंतु शासनाकडे निधीच नसल्याने त्यावर निर्णय झाला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संत्रा बागायतदारांच्या भरपाईवर आता निवडणुका झाल्यावरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी देखील संत्रा बागायतदारांच्या भरपाई संदर्भात सातत्याने ‘तारीख पे तारीख’च देण्यात आली होती. हा अनुभव पाठीशी असल्याने संत्रा बागायतदारांमध्ये भरपाईवरून अस्वस्थता आहे.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र (आकडे कोटी रुपयांत)

मोर्शी : २३.०३

चांदूररेल्वे : ३.७०

भातकुली : २.५९

चिखलदरा : २५.४९

तिवसा : १०.४६

वरुड : ७७.०५

अमरावती : ३.३१

धामणगाव रेल्वे : ३.७०

नांदगाव खंडेश्‍वर : ९२.२६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com