Orange Market : बांगलादेशमुळे संत्र्याचे दर दबावात

Orange Rate : भारताकडून आयात-निर्यात धोरणात सातत्याने होणाऱ्या बदलाचा फटका बसलेल्या बांगलादेशनेही भारतातून आयात होणाऱ्या संत्र्यावर शुल्क वाढ केली आहे.
Orange Market
Orange MarketAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : भारताकडून आयात-निर्यात धोरणात सातत्याने होणाऱ्या बदलाचा फटका बसलेल्या बांगलादेशनेही भारतातून आयात होणाऱ्या संत्र्यावर शुल्क वाढ केली आहे. प्रती किलो ८८ रुपये एवढे आयात शुल्क आकारले जात असल्याने संत्र्याची निर्यात यंदा ठप्प झाली आहे. त्यामुळे देशांतर्गंत बाजारपेठेत संत्र्याचे दर घसरले असून, या प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड असून त्यापासून सुमारे पाच लाख टनांची उत्पादकता होते. विदर्भात संत्र्याखाली १ लाख हेक्‍टर क्षेत्र असून त्यातील ७० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्यावरूनच संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक असतानाही त्याच्या मूल्यवर्धन व संवर्धनाकडे या भागातील राज्यकर्त्यांचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

Orange Market
Orange Export : बांगलादेशमधील संत्रा निर्यात थांबली; ‘रॉयल्टी’त मोठी वाढ

बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा एकमेव आणि सर्वांत मोठा आयातदार आहे. परंतु गेल्या काही वर्षात बांगलादेशने सातत्याने आयात शुल्क वाढ केली आहे. २०१९ मध्ये आयात शुल्क २० रुपये होती. २०२० मध्ये ३०, २०२१ मध्ये ५१, २०२२ मध्ये ६३ आणि आता थेट प्रती किलो आयात शुल्क ८८ रुपये करण्यात आली आहे.

संत्र्याचे दर, वाहतूक खर्च आणि त्यावरील आयात शुल्क याचा विचार करता प्रती किलोचा दर वाढतो. त्यामुळे बांगलादेशी ग्राहकांची मागणी नागपुरी संत्र्याला कमी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून हंगामात दररोज सरासरी १०० टनांपेक्षा अधिक मालाची निर्यात होते. आता मात्र आयात शुल्क वाढीमुळे ती ठप्प झाली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात संत्र्याचे दर दबावात आल्याने बागायतदारात अडचणीत आले आहेत.

Orange Market
Orange Crop Insurance : संत्रा बागायतदारांना मिळणार सुमारे १४ कोटी रुपयांचा विमा

असा आहे निर्यात खर्च

विदर्भातून बांगलादेशात संत्रा न्यावयाचा झाल्यास २५ टन संत्र्याला किमान २ लाख ४५ हजार रुपये इतका वाहतूक खर्च होतो. बांगलादेश सीमेपर्यंतचा खर्च १ लाख ७५ हजार इतका आहे. सीमेपासून बांगलादेशातील ट्रकमध्ये पुन्हा त्याचे लोडिंग करावे लागते. त्यापुढील बाजारपेठेपर्यंतचा खर्च वेगळा करावा लागतो. प्रती किलो ८८ रुपये आयात शुल्कानुसार २२ टन संत्र्यासाठी २२ लाख रुपये भरावे लागतात.

आयात शुल्कात वाढ ही बांगलादेश सरकारचा अंतर्गत धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगितले जाते. त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. ही बाब योग्य असली तरी राजकीय मुत्सद्देगिरीचा वापर करून किंवा निर्यात अनुदान देत यावर तोडगा काढता येणे शक्‍य आहे. संत्रा बागायतदारांनी देखील सरकारवर दबावासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज
भूतानमधून आयात होणाऱ्या संत्र्यावर कोणतेही शुल्क नाही तर दक्षिण आफ्रिकेतील संत्र्यावर भारतापेक्षा कमी आयात शुल्क आकारले जाते. त्यावरूनच भारताप्रतीचे बांगलादेशचे धोरण स्पष्ट होते. राज्य व केंद्र सरकारने त्यानुसार आपल्याही धोरणात बदलाची गरज आहे.
- जावेद खान हस्ते खान पठाण, संत्रा प्रक्रिया उद्योजक व निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com