Cotton Bag Corruption: कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत ४१ कोटींचा भ्रष्टाचार

Nana Patole: तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे.
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शिर्षकाखाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी (ता. ६) केली आहे.

Nana Patole
Onion Scam Maharashtra : कोट्यावधींचा कांदा घोटाळा; राज्यातील १५ कंपन्यांवर केंद्राकडून थेट कारवाई

नाना पटोले म्हणाले, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार करण्यात आला असून, ७७.२५ कोटी रुपये यासाठी देण्यात आले.

एकाच परिवारातील ४ वेगवेगळ्या कंपन्यांना बेकायदेशीररीत्या निविदा काढून हे काम देण्यात आले. यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक तथा उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार यांनी त्यांच्या मर्जीतील एका पुरवठादाराला माहिती देऊन त्यांच्या संगनमताने सर्व प्रक्रिया राबवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. ही खरेदी प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच करण्यात आली.

Nana Patole
Gunny Bag Supply Scam: धान खरेदीत बारदाना पुरवठ्यात २५ लाखांचा गैरव्यवहार उघड!

या कामासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली त्यातील तीन कंपन्या ओसवाल या एकाच परिवारातील आहेत. तर चौथी कंपनी ओसवाल यांच्या सनदी लेखापालाची आहे. यंत्रमाग महामंडळाने या पिशव्या खरेदीसाठी प्रति पिशवी १२५० रुपयांचा दर मंजूर करण्यात आला. आयसीएआर नागपूर यांना याच पिशव्या ५७७ रुपये या दराप्रमाणे पुरवठा करण्यात आल्या आहे. म्हणजे प्रति पिशवी ६७३ रुपये जास्त दराने खरेदी करून एकूण ४१ कोटी ५९ लाख ३५ हजार ५३६ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

नाना पटोले काय म्हणाले...

बेकायदेशीररीत्या निविदा काढल्या, एकाच परिवाराच्या चार कंपन्यांना काम.

निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजुरी कशी दिली?

५७७ रुपयांची पिशवी १२५० रुपयांना खरेदी करून ४१.५९ कोटी रुपयांचा केला भ्रष्टाचार.

महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक (एमडी) तथा उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे भ्रष्टाचारात संगनमत.

या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com