
Hingoli News: राज्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत संत नामदेव हळद मार्केटमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षामध्ये हळदीची २ लाख ३६ हजार ४६६ क्विंटल आवक झाली. वर्षभरात हळदीला प्रतिक्विटंल सरासरी ११५९२ ते १५६८० रुपये दर मिळाले. २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये हळदीच्या आवकेत २३ हजार २९० क्विंटलने घट झाली.
संत नामदेव हळद मार्केटमध्ये मागील आर्थिक वर्षात सप्टेंबर (२०२४) महिन्यात सर्वाधिक म्हणजे २९ हजार २९२ क्विंटल तर फेब्रुवारी (२०२५) महिन्यात सर्वात कमी १० हजार ६०१ क्विंटल हळदीची आवक झाली. हळदीला मार्च (२०२५) महिन्यात सर्वात कमी म्हणजे प्रतिक्विंटल सरासरी ११५९२ रुपये तर मे (२०२४) महिन्यात सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल सरासरी १५६८० रुपये दर मिळाले.
संत नामदेव हळद मार्केटमध्ये हिंगोली जिल्हाभरातून तसेच शेजारील परभणी,नांदेड जिल्ह्यांसह विदर्भातील वाशीम-यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यातून हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. जाहीर लिलावाद्वारे खरेदी केली जाते. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात २ लाख ५९ हजार ७५६ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी प्रति क्विंटल सरासरी ५८९८ ते १६०७४ रुपये दर होते. २०२२-२३ मध्ये १ लाख ९४ हजार ३२३ क्विंटल आवक झाली होती. वर्षभरात प्रति क्विंटल सरासरी ६५६६ रुपये दर मिळाले.
संत नामदेव हळद मार्केट २०२४-२५ आवक-दर स्थिती (आवक क्विंटलमध्ये दर रुपयात)
महिना आवक क्विंटल सरासरी भाव
एप्रिल १७७०५ १५५५४
मे २४४५० १५६८०
जून १५९०० १४५९०
जुलै १४९२१ १३९२७
ऑगस्ट २७९५८ १३०३७
सप्टेंबर २९२९२ १३१४७
ऑक्टोंबर १८४६५ १२२९४
नोव्हेंबर १८८३८ १२७६०
डिसेंबर २७७५५ १२५३१
जानेवारी १७८११ १३०१३
फेबुवारी १०६०१ १२०५९
मार्च १२७७० ११५९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.