Chana Market : हरभऱ्याची २२९६ क्विंटल आवक

Chana Production : माजलगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवकेत चांगलाच चढ-उतार पाहायला मिळाला. आवक २२४ ते ९१० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात राहिली.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Beed News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ ते २२ मार्च दरम्यान हरभऱ्याची २२९६ क्विंटल आवक झाली. या हरभऱ्याला ४९५० ते ५३५१ रुपये प्रति क्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. माजलगाव बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवकेत चांगलाच चढ-उतार पाहायला मिळाला. आवक २२४ ते ९१० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात राहिली.

बाजरीची एकूण आवक ६३७ क्विंटल झाली. ६० ते २२५ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. पांढऱ्या तुरीची एकूण आवक १२८० क्विंटल झाली.

Chana Market
Chana Threshing : काबुली हरभरा मळणीला गती

तुरीच्या अवगतही कमालीचा चढउतार राहिला. १८० ते ३६६ क्विंटल दरम्यान तुरीची कमी अधिक प्रमाणात आवक झाली. ज्वारीची एकूण आवक १ हजार ४५५ क्विंटल झाली. २५५ ते ४१४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ज्वारीला सरासरी २३०० ते २४५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

Chana Market
Chana Threshing : खानदेशात हरभरा मळणी पूर्णत्वाकडे

मूग, मका, करडईची नगण्य आवक

माजलगाव बाजार समितीमध्ये एक वेळा एक क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मुगाला ७२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. एक वेळा २७ क्विंटल व एक वेळा १४ क्विंटल आवक झालेल्या मुगाला अनुक्रमे २०५० व १९८१ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

करडईची एक वेळा १५ क्विंटल आवक झाली. या करडईला ५२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. राजमाची एकूण आवक ५४ क्विंटल झाली. या राजमाला सरासरी ४७०० ते सहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com