Chana Threshing : काबुली हरभरा मळणीला गती

Kabuli Chana : खानदेशात मोठ्या काबुली हरभरा पिकाच्या क्षेत्रात सतत वाढ होत आहे. पीक पक्व होऊन मळणी सुरूच आहे. सुमारे २८ ते ३० हजार हेक्टरवर काबुलीची पेरणी झाली होती.
Chana Harvesting
Chana Harvesting Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मोठ्या काबुली हरभरा पिकाच्या क्षेत्रात सतत वाढ होत आहे. पीक पक्व होऊन मळणी सुरूच आहे. सुमारे २८ ते ३० हजार हेक्टरवर काबुलीची पेरणी झाली होती. त्याची मळणी या महिन्यात सुरूच राहणार आहे.

खानदेश मोठ्या काबुली हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यास गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, बडोदा, मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाल व राज्यातील अनेक बाजारांत मागणी असते. त्याचे दरही देशी किंवा तपकिरी, फिकट गुलाबी हरबऱ्याच्या तुलनेत अधिक असतात. त्याची पेरणी जळगावातील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर या भागात केली जाते.

Chana Harvesting
Chana Harvesting : हरभरा काढणीच्या कामाला आला वेग

याच भागात त्याचे मोठे क्षेत्र असते. परंतु यंदा काबुलीची पेरणी खानदेशात सर्वत्र होत आहे. या हरभऱ्याची पेरणी काढणी पूर्ण झालेल्या केळी बागा, कापसाखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात झाली होती. मोठ्या काबुलीचे बियाणेही महाग होते. त्याची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनेक जण खानदेशात करतात. ही पेरणी सुरूच आहे.

Chana Harvesting
Chana Harvesting : अकोल्यात हरभरा पीक काढणीला येऊ लागला वेग

अनेकांनी नोव्हेंबर व या महिन्यात पेरणी केली. पीक पक्व झाले आहे. यंदा पेरणी नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, धुळ्यातील धुळे, साक्री, जळगावातील मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर या भागांतही झाली आहे. पाऊसमान चांगले राहिल्याने मोठ्या काबुलीची पेरणी वाढल्याची माहिती आहे. सर्वाधिक पेरणी जळगाव जिल्ह्यात सुमारे १८ ते १९ हजार हेक्टरवर झाली आहे.

मका अधिक

खानदेशात रब्बीत हरभरा प्रमुख पीक होते. पण यंदा मका लागवड अधिक होती. पण चांगले दर देणारा हरभरा पीक म्हणून लहान व मोठ्या काबुलीस शेतकरी पसंती देतात. खानदेशात देशी व अन्य हरभरा पिकांची एकूण दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे ९८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हरभरा पीक होते. काळ्या कसदार जमिनीत कमी पाण्यात येणारे हरभरा वाणही असल्याने कमी पाणी व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभऱ्यास पसंती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com