यंदा उडीद भाव खाणार?

देशात यंदा उडदाची लागवड (Black Gram Cultivation) काहीशी वाढली. मात्र महत्वाच्या उडीद उत्पादक (Black Gram Producer) राज्यांत पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. त्याचा फटका पिकाला बसत आहे. देशातील परिस्थिती पाहून भारताला उडीद निर्यात करणाऱ्या देशांनीही दर वाढवले.
Black Gram
Black GramAgrowon

देशातील भात लागवडीतील पिछाडी भरून निघेल

खरिपाच्या उर्वरीत हंगामात देशात भात लागवडीतील पिछाडी भरून निघेल, असं म्हटलंय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी. यंदा भात पेऱ्यात ३५ लाख हेक्टरची घट झालीय. भात हे देशातील प्रमुख खरीप पीक आहे. देशात भाताचं जेवढं उत्पादन होतं, त्यातलं ८० टक्के पीक खरिपातलं असतं. देशाच्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीने भाताचं स्थान महत्त्वाचं आहे. भारत भात उत्पादनात जगात दुसऱ्या नंबरवर आहे. तर तांदूळ निर्यातीत अव्वल आहे. गेल्या वर्षी देशात जुलैअखेर सुमारे २६७ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. यंदा मात्र सुमारे २३१ लाख हेक्टरवरच भात लागवड झालीय. प. बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा या प्रमुख राज्यांत पावसाचं प्रमाण कमी असल्याने भाताची लागवड घटलीय. खरिपाच्या उरलेल्या दिवसांत पेरा वाढेल, असा अंदाज कृषिमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

Black Gram
Tur Sowing : खानदेशात तूर लागवड स्थिर

कमी उत्पादनाच्या अंदाजामुळे तुरीच्या दरात तेजी

देशातील खरीप पेरण्यांचा कालावधी संपत आलाय. मात्र आत्तापर्यंत तुरीची लागवड १३ टक्क्यांनी कमी आहे. त्यातच पावसाचा फटका पिकाला बसतोय. त्यामुळं देशात यंदा तुरीचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. परिणामी देशातील बाजारांत तुरीच्या दरात वाढ झाली. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार रुपयांचा दर मिळतोय. देशात तुरीचे दर वाढल्यानं निर्यातदारांनी दर वाढवले. म्यानमारमध्ये तुरीचे दर ९०० डाॅलर प्रतिटनांवर पोचले. जुलै महिन्यात हाच दर ८३० डाॅलरच्या दरम्यान होता. म्हणजेच आयात तूरही स्वस्त मिळत नाही. त्यामुळे देशातील बाजारात तुरीचे दर मजबूत स्थितीत राहण्याची शक्यता आहे.

Black Gram
Chana : हरभरा विक्रीचे चुकारे थकलेलेच

नाफेडकडील साठ्यामुळे हरभरा दर दबावात

नाफेडकडे सध्या २९ लाख टनांच्या दरम्यान हरभऱ्याचा स्टाॅक आहे, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सध्या नाफेडने खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री कमी केली. त्यामुळं हरभरा दर स्थिर आहेत. सध्या देशात हरभरा दर ४ हजार ७०० ते ५ हजार १५० रुपयांच्या दरम्यान आहेत. नाफेडकडे मोठा साठा असल्यानं बाजारातील दर दबावात आहेत. नाफेड सणांच्या काळात हरभऱ्याचा साठा बाहेर काढेल, त्यामुळं दरात जास्त तेजी येण्याची शक्यता नाही. त्यामुळं व्यापारही सुस्त आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

Black Gram
खरिपात शेतकऱ्यांकडून तूर, उडीद लागवडीस पसंती

देशात मका दरातील तेजी कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात टंचाई जाणवत असल्याने मका दर सध्या तेजीत आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारातही जाणवतोय. सोयापेंड, सरकीपेंड, तांदूळ आणि गव्हाचे दर जास्त असल्यानं पशुखाद्यात मक्याचा वापर वाढलाय. त्यामुळं देशात मक्याचे दरही वाढले. सध्या देशातील विविध बाजार समित्यांत मक्याला प्रतिक्विंटल १९०० ते २६०० रुपये दर मिळतोय. तर एनसीडीईएक्सवरील वायदे २५६२ रुपयाने झाले. मागणी असल्यामुळं मक्याचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळतोय.

यंदा उडीद भाव खाणार?

देशात मागील काही वर्षांपासून उडदाचं उत्पादन (Black Gram Production) घटतंय. उडदाचा पेरा (Black Gram Sowing) सरासरी क्षेत्राएवढा होत असतो. मात्र ऐन उडिद काढणीच्या (Black Gram Harvesting) काळात पाऊस आणि अतिवृष्टीमुळं पीक (Crop Damage Due To Heavy Rain) हातचं जातंय. त्यामुळं महाराष्ट्रासह काही राज्यांत खरिपातील उडदाची लागवड (Black Gram Cultivation) घटली. यंदा देशात मागीलवर्षापेक्षा काहीशी लागवड वाढली. आत्तापर्यंत २८ लाख हेक्टरवर उडदाची लागवड झाली. पण माॅन्सूनचा पाऊस यंदा कमी अधिक प्रमाणात झाला. मध्य प्रेदशात सर्वाधिक लागवड असते. त्यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा नंबर लागतो. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात जून महिन्यात कमी पाऊस झाला तर जुलैमध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं.

सततच्या पावसानं पिकाला फटका बसला. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कमी पावसानं पीक हातच जातंय. त्यामुळं यंदा देशात उडीद उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळं बाजारात उडदाचे दर वाढले. हे पाहून बर्मा देशातील निर्यातदारांनी दरात वाढ केली. उडदाचे दर निर्यातदारांनी टनामागे ४० ते ४५ डाॅलरने वाढवले. सध्या बर्माचा उडीद ९६५ ते १०९५ डाॅलर प्रतिटनानं मिळतोय. तर देशात उडदाला ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी मिळतोय. सध्या उडदाची लागवड सुरु आहे. मात्र पुढील काही दिवसांत उत्पादनाचं चित्र स्पष्ट होईल. त्यामुळं दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त होतेय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com