Devendra Shirurkar
चालू खरिप हंगामात कर्नाटकातील शेतकऱ्यांनी तृणधान्यापेक्षा कडधान्य लागवडीला पहिली पसंती दिली. राज्यात कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातही अपेक्षेप्रमाणे वाढ झाली असून शेतकऱ्यांनी तूर, उडदाची लागवड केली.
कर्नाटकातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कापूस,कडधान्य आणि तेलबिया लागवडीस पसंती दिली आहे. १० जुनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत कापूस, सूर्यफूल लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली तर कडधान्यापैकी तूर आणि हरभऱ्याचे लागवड क्षेत्र यंदा वाढले.
जानेवारी ते मे दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदाच्या जूनमध्ये पहिल्या १० दिवसांत सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत चामराजनगर, मंड्या, हसन, चिक्कमंगळूर, तुमकूर, कोप्पल, रामनगर, म्हैसूर, चित्रदूर्ग आदी जिल्ह्यांत ३.१६ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात. या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कापसासोबतच सूर्यफूल, तीळ, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना पसंती दिलीय.
राज्यातील कडधान्य लागवडीखालील क्षेत्रातही अपेक्षेप्रमाणे वाढ झाली. गेल्यावर्षीच्या २.६६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा कडधान्य लागवडीखालील क्षेत्र ३.३३ लाख हेक्टरवर गेले आहे. गेल्यावर्षी ४८ हजार हेक्टरवर तूर घेण्यात आली होती.
यंदा तूर लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन ते ६७ हजार हेक्टरवर गेले आहे. तूरीप्रमाणेच उडीद लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली. गेल्यावर्षीच्या १.३९ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात उडदाची लागवड करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.