Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती. पण देशातील बाजारात सध्या सोयाबीनच्या भावात १०० रुपयांपर्यंत वाढ दिसून आली.
सोयाबीला आज सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनच्या भावात पुढील महिना-दीड महिन्यात आणखी ५ ते १० टक्के सुधारणा अपेक्षित आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
कापसाच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत भाव काहीसे नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ६१ हजार ५६० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील आवक कमी झाली.
कालची आवक ६० हजार गाठींवर होती. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस भावात सुधारणा अपेक्षित आहे. पण दरात चढ उतारही राहतील, अशा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
दुष्काळामुळे घटलेले उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून भाव पाडले आहेत. बाजारात आता उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे.
पण आवकेचा दबाव तेवढ्या प्रमाणात नाह. पण सरकाच्या धोरणामुळे सध्या भाव १२०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारातील आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे. मिरचीची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे. लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे.
सध्या हिरव्या मिरचीला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
देशातील उत्पादन कमी राहूनही मक्याचा बाजारा मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. तसं पाहीलं तर मक्याला देशात सध्या चांगली मागणी आहे. इथेनाॅलसाठी यंदा मक्याला चांगला उठाव मिळत आहे. तर पोल्र्टी आणि स्टार्च उद्योगाकडूनही मागणी आहे.
बाजारातील आवकही टिकून आहे. सध्या मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.