Agrowon Podcast : हरभऱ्याला बाजार समित्यांमध्ये आज काय भाव मिळाला?

Market Update : हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचला.
Chana
Chana Agrowon

Market Bulletin : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. मात्र भावातील घसरण थांबून भाव स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहीशी वाढही दिसून आली. देशातील बाजारात मात्र भाव कायम आहेत.

आजही सोयाबीन सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक टिकून आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे भाव दबावात असल्याने उद्योगांची खरेदी चांगलीच वाढली आहे. उद्योग कापसाचा स्टाॅक करत असल्याने सीसीआयला कापूस कमी मिळतोय. बाजारातील आवक १ लाख ७० हजार गाठींच्या दरम्यान कायम आहे. कापसाचा भावही टिकून आहे. कापसाला आजही ६ हजार ४०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

वायद्यांचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात भाव एका पातळीच्या दरम्यान दिसत आहेत. कापसाची बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Chana
Chana Sowing : हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने पार केला सरासरी क्षेत्राचा टप्पा

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये वाढले आहेत. यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळे हरभरा भाव वाढले आहेत. त्यातच सरकारकडील स्टाॅकही कमी होत आहे. त्यामुळे हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचला.

सरकार निवडणुका होईपर्यंत हरभरा दबावातच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हरभरा भाव जास्त कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. निवडणुकांनंतर हरभरा बाजारात सुधारणाही दिसू शकते, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Chana
Chana Rate : किरकोळ बाजारात हिरव्या हरभऱ्याचे दर २० रुपये किलो


तुरीच्या भावाताल तेजी कायम आहे. सध्या तूर आवकेचा हंगाम आहे. एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते. पण यंदा आफ्रिकेतून होणारी तूर आयात कमी आहे. त्यातच उत्पादन घटल्याने शेतकरीही मर्यादीत विक्री करत आहेत.

यामुळे तुरीच्या भावाला चांगलाच आधार आहे. सध्या तुरीला देशात ९हजार ५०० ते १०  हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहीली तर हा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com