Chana Rate : किरकोळ बाजारात हिरव्या हरभऱ्याचे दर २० रुपये किलो

Green Chana Rate : सध्या व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याला प्रतिएकरी ३५ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती काकडा परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.
Chana Rate
Chana Rate Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : बाजारात हरभऱ्याचे दर दबावात आल्यामुळे हिरव्या हरभऱ्याला देखील मागणी कमी झाली आहे. सध्या व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याला प्रतिएकरी ३५ हजार रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती काकडा परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. गेल्या महिन्यात हेच दर प्रतिएकरी ६० हजार रुपयांवर होते.

घाटे असलेल्या हिरव्या हरभऱ्याला ग्राहकांची मागणी राहते. सुरुवातीला आवक कमी असताना ४५ ते ५० रुपये किलोपर्यंतचा दर मिळतो. सध्या किरकोळ बाजारात २० रुपये किलो दर मिळत असल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले.

अचलपूर तालुक्‍यातील काकडा परिसरात सिंचन सुविधांच्या बळावर भाजीपाला व इतर व्यवसायिक पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. गेल्या काही वर्षांपासून हिरवा हरभरा हे शेतकरी घेतात. याला चांगला दर मिळत असल्याने यात सातत्य आहे. सप्टेंबर महिन्यात याची लावगड होते.

Chana Rate
Chana Crop : ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकावर परिणाम

एकरी ५५ ते ६० किलो बियाणे वापरले जाते. तीन महिन्यात हे पीक विकण्यास तयार होते. महिनाभरापूर्वी हरभरा दर तेजी असल्याने हिरव्या हरभऱ्याचा व्यवहार व्यापाऱ्यांनी प्रतिएकरी ६० हजार रुपयांप्रमाणे केला. या दराने काही शेतकऱ्यांच्या शेतातील हिरवा हरभरा तोडणीचे कामही झाले.

Chana Rate
Tur, Chana Market: शेतकऱ्यांच्या हातावर अमित शहांची तुरी ? हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीचा वापर सरकार भाव पाडण्यासाठीच करणार 

आता मात्र आवक वाढल्याच्या परिणामी हिरव्या हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याने व्यापाऱ्यांकडून पूर्वीचा तोंडी करार रद्द करून ३५ हजार रुपये प्रतिएकरचा दर देणार असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला तोंडी करार करतेवेळी व्यापाऱ्यांकडून टोकण स्वरूपात चार ते पाच हजार रुपयांची रक्‍कम दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष तोडणीच्यावेळी बाजारात चढउतार झाल्यास व्यापारी करार रद्दही करतात.

परिणामी शेतकऱ्यांना नुकसानही सोसावे लागते. हिरव्या हरभऱ्याच्या काढणीनंतर काही शेतकरी गहू, हरभरा या सारखी पिके घेतात. त्यामुळे ही पीकपद्धती त्यांना फायदेशीर ठरते, असा अनुभव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com