Turmeric : हळदीच्या दराला कशाचा मिळतोय आधार?

देशात यंदा हळद लागवडीत अपेक्षेइतकी वाढ झालेली नाही. अनेक भागांत पीक आता अडीच महिन्यांच झालं. मात्र काही भागात सततच्या पावसाने पिकाला फटका बसत आहे.
Turmeric
TurmericAgrowon

लातूरमध्ये सोयाबीन २०० रूपयांनी नरमले

देशातील बाजारपेठांमध्ये शुक्रवारी सोयाबीनचे दर १०० ते १५० रुपयांनी नरमले. राज्यातील महत्वाच्या लातूर बाजार समितीमध्ये क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली. तर अकोला बाजारात २५० रुपयांने दर कमी झाले. मध्य प्रेदशातील इंदोर बाजारातही सोयाबीन दर १०० रुपयाने नरमले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेचे दर कमी झाले आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवल्याचं जाणकारांनी सांगितलं. शुक्रवारी सीबाॅटवर सोयाबीन आणि सोयापेंडेचे वायदे जवळपास एक टक्क्याने घसरले होते. त्याचे पडसाद देशातील बाजारावर उमटले.

Turmeric
Palm Oil: मलेशिया आणि भारतात पामतेलासाठी सामंजस्य करार

मलेशियातील पामतेलाचा साठा वाढल्याने चिंता

जुलै महिन्यात मलेशियातील पामतेलाचा साठा आठ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचलाय. आता तुम्ही म्हणाल मलेशियातील पामतेलाच्या साठ्यावरून आम्हाला काय करायच? पण पामतेलाच्या दरावरूनच देशातील खाद्यतेलाचे दर ठरत असतात. पामतेल महागलं की देशातील खाद्यतेलही महाग होतं. याचा परिणाम देशातील सोयाबीन, मोहरी, शेंगदाणा दरावर होत असतो. जुलै महिन्यात मलेशियात जवळपास १८ लाख टन पामतेलाचा साठा होता. मलेशिया हा साठा बाहेर काढणार आहे. त्यामुळे खाद्यतेल बाजारात त्याची प्रतिक्रिया उमटेल, असं जाणकारांनी सांगितलंय.

Turmeric
Tur : आयात तुरीतील तेजी बाजाराच्या पथ्यावर?

तुरीच्या दरात ३०० रुपयांची वाढ

देशात तूर लागवड मागील आठवड्याच्या तुलनेत वाढलीय. ताज्या आकडेवारीनुसार तुरीची लागवड ३९ लाख ८० हजार हेक्टरवर झालीय. मात्र मागील वर्षीपेक्षा तुरीचा पेरा अजूनही १०.४२ टक्क्यांनी कमीच आहे. शुक्रवारी केंद्र सरकारचे हे आकडे जाहीर झाले. तूर लागवड घटल्याच्या बातमीने तुरीच्या दरात जवळपास ३०० रुपयांची तेजी आली. अमरावती बाजारात कमाल दर ८२०० रुपये तर सरासरी दर ८००० रुपये झाला. लातूर बाजारातही कमाल दराने ८३०० ची पातळी गाठली, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Turmeric
Pulses: छत्तीसगडमध्ये कडधान्यांच्या सरकारी खरेदीची हमी

निर्यात वाढल्याने कडधान्यांच्या दराला आधार

भारताची कडधान्य आयात नेहमी निर्यातीपेक्षा अधिक असते. मात्र यंदा एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील निर्यात जास्त झाली. या काळात २ लाख ७३ हजार टन आयात झाली होती. तर निर्यात २ लाख ७५ हजार टनांवर पोचली. मे महिन्यातील निर्यात ८६ हजार टनाने अधिक होती. देशातून कडधान्य निर्यात वाढली आणि लागवड कमी झाली. तसचं आयात मालही महाग झाला. त्यामुळं देशात कडधान्याचे दर वाढले आहेत. याचा फायदा खरिपातील तूर, मूग आणि उडदाला होऊ शकतो. या तीनही मालाचे दर बाजारात सुधारत आहेत.

हळदीच्या दराला कशाचा मिळतोय आधार?

सध्या बाजारात हळदीचे दर (Turmeric Rate) काहीसे सुधारल्याचे दिसून चित्र आहे. हळद उत्पादनात (Turmeric Production) भारत जगात आघाडीवर आहे. जगातील ८० टक्के हळद भारत पिकवतो. देशात दरवर्षी २० ते २५ टक्क्यांनी हळदीचं क्षेत्र (Area Of Turmeric) वाढतंय. मात्र गेल्या वर्षी हळदीच्या दरात फारशी तेजी आली नाही. त्यामुळे यंदा केवळ १५ टक्क्यांनी क्षेत्र वाढल्याचं जाणकारांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी यंदा २ लाख ७५ हजार हेक्टरवर हळदीचं पीकं (Turmeric Crop) घेतलंय. भारतातून हळदीची निर्यातही (Turmeric Export) मोठ्या प्रमाणावर होते. मात्र मागील हंगामात हळदीची मागणी कमी झाली होती. कोरोनाकाळात वाढलेला खप कमी होऊन दरही नरमले होते. त्यामुळं यंदा हळदीचं क्षेत्र अपेक्षेप्रमाणं वाढलं नाही.

आता हळद लागवड करून अडीच महिने झालेत. सध्या हळद पीक कंद वाढीच्या स्थितीत आहे. मात्र, अतिपावसामुळं महत्वाच्या हळद उत्पादक पट्ट्यात पिकाला फटका बसतोय. अनेक ठिकाणी पिकात पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे तिथे पिकावर कंद कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनात घट येईल. उत्पादन घटीची शक्यता निर्माण झाल्यानं दराला आधार मिळतोय. त्यातच सध्या बाजारात हळदीची आवक कमी आहे. त्यामुळं दर ६ हजार ३०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर शुक्रवारी एनसीडीईएक्सवरील हळदीचे वायदे एक टक्क्याने सुधारले. हळदीचे ऑगस्टचे वायदे ७ हजार ३५८ रुपयाने झाले. पुढे सणांच्या काळात हळदीला आणखी मागणी वाढेल. त्यामुळं हळदीच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com