Agrowon Podcast : कापूस, सोयाबीन, हळद तसेच गहू दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हळद, कांदा आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. तर देशातील वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७२.२८ सेंटवर होते. देशातील वायदेही ५७ हजार ८५० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी झाली. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.६२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६१ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Agrowon Podcast : हरभरा भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच गवार दर काय आहेत?

हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Mango Import : अमरावती बाजारात आंबा आवक १३०० क्‍विंटलवर

कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासन काहीसे चढ उतार दिसत आहेत. मात्र कांद्याची सरासरी दरपातळी वाढलेली दिसते. बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठव, यामुळे कांद्याटचे भाव सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या कांद्याचा सरासरी भाव २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

गव्हाचे देशातील अनेक बाजारांमध्ये काहीसे सुधारत आहेत. देशाच्या अनेक भागात पाऊस सुरु झाल्याने बाजारातील आवक कमी झाली. दुसरीकडे सरकारची बाजारातील विक्रीही बंद आहे. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com