Agrowon Podcast : हळदीचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, हिरवी मिरची तसेच काय कांदा दर आहेत?

Daily Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, हळद, कांदा आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ९.८७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या भावात सुधारणा होऊन ३१६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते.

देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीनला आजही सरासरी ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनच्या भावावर यंदा पुरवठा वाढीचा दबाव आहे. हा दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Tur Price Drop : तूर बाजारात येण्यापूर्वीच मोठी दरघसरण; शेतकरी चिंतेत

कापूस दबावातच

देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या भावावर दिसत आहे. कापसाचे भाव हंगाम सुरु झाल्यापासूनच दबावात आहेत.

आजही देशातील बाजारात २ लाखांपेक्षा अधिकची आवक झाली होती. त्यामुळे कापसाचा भाव आजही देशातील बाजारात ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. तर सरकीचे भावही टिकून आहेत. बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीचा बाजार टिकून

देशातील बाजारता हळदीचा बाजार मागील काही आठवड्यांपासून स्थिरावला आहे. हळदीचे भाव गेल्या वर्षभरातील उच्चांकी २० हजारांपासून १३ हजारांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील हळदीची लागवड वाढली. मात्र पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचाही फटका बसत आहे. त्यामुळे हळद उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

आज देशातील बाजारात हळदीला १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. नव्या मालाची आवक पुढील ३ आठवड्यांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काही आठवडे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Update
Agrowon Podcast : गव्हाचा बाजारभाव टिकून; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत आजचे ज्वारी दर?

कांदा भाव टिकून

कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे. कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत. बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. तर उठावही चांगला आहे.

त्यामुळे कांद्याला बाजारात सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याची भावपातळी मागील काही दिवसांपासून दिसत आहे. पुढील दोन आठवड्यांनंतर देशभरातील कांदा आवक आणखी सुधारू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हिरवी मिरची टिकून

बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. दुसरीकडे बाजारात मागणीही टिकून आहे.

परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com