Maharashtra Agriculture Market Bulletin: तूर दरांना आधारराज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारात आवक आणि दरांमध्ये बदल दिसून आले होते. लातूर बाजारात तुरीची आवक १ हजार ६८४ क्विंटलवरून १ हजार ९०८ क्विंटलपर्यंत वाढली होती. या बाजारात तुरीला कमीत कमी ७ हजार १ रुपये तर जास्तीत जास्त ७ हजार ७९१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसेच, अकोला बाजारात तुरीची आवक ७४४ क्विंटलवरून ६५१ क्विंटलपर्यंत कमी झाली होती. येथे तुरीला कमीत कमी ६ हजार ७०० रुपये ते जास्तीत जास्त ७ हजार ८९५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर दुधणी बाजारात तुरीची आवक ६६२ क्विंटलवरून ३३० क्विंटलपर्यंत घटली होती. मात्र, सरासरी दर ७ हजार २७४ रुपयांवरून ८ हजार १५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला होता. या बाजारात तुरीला कमीत कमी ५ हजार ५०० रुपये तर जास्तीत जास्त ८ हजार १५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. एकूणच, तूर बाजारात काही ठिकाणी आवक वाढली तर काही ठिकाणी घटली. मात्र, दर स्थिर ते समाधानकारक राहिल्याचे चित्र दिसून आले..कांदा दरात सुधारणाराज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमधील उन्हाळी कांद्याच्या बाजारात आवक आणि दरांतील चढ-उतारात बदल दिसून आले.पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याची आवक २० हजार ५० क्विंटलवरून १९ हजार ८०० क्विंटलपर्यंत किंचित घटली होती. मात्र, सरासरी दर २ हजार २५० रुपयांवरून २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढला होता. तर, कमाल दर २ हजार ९२६ रुपयांवरून २ हजार ९६१ रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच, मालेगाव-मुंगसे बाजारात कांद्याची आवक १४ हजार क्विंटलवरून १२ हजार क्विंटलपर्यंत कमी झाली होती. मात्र, सरासरी दर १ हजार ४०० रुपयांवरून १ हजार ७१० रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुधारला होता. कमाल दरही २ हजार २१ रुपयांवरून २ हजार ३०१ रुपये प्रति क्विंटल झाला होता. तसेच, चांदवड बाजारात कांद्याची आवक ९ हजार ५९३ क्विंटलवरून १० हजार ७५ क्विंटलपर्यंत वाढली होती. तसेच, कमाल दर २ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. एकूणच, प्रमुख बाजारांमध्ये कांद्याच्या सरासरी आणि कमाल दरांमध्ये सुधारणा दिसून आली होती..Agrowon Podcast: सोयाबीन-अननस भावात सुधारणा, आल्याचा बाजार तेजीत, भेंडीचे दर टिकून तर टोमॅटो बाजार स्थिर.गवार दरात चढ-उतारराज्यातील गवारच्या बाजारात आवक आणि दरांमध्ये चढ-उतारच दिसून आले होते. पुणे बाजारात गवारची आवक कालच्या तुलनेत २११ क्विंटलवरून १६२ क्विंटलपर्यंत घटली होती. तसेच, सरासरी दर ४ हजार रुपयांवरून ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमी झाला होता. त्यामुळे गवारला कमीत कमी २ हजार ते जास्तीत जास्त ५ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसेच, नागपूर बाजारात गवारची आवक ८० क्विंटलवरून १०० क्विंटलपर्यंत वाढली होती. सरासरी दर ५ हजार ५०० रुपयांवरून ५ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुधारला होता. तर गवारला कमीत कमी ५ हजार ते जास्तीत जास्त ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. खेड-चाकण बाजारात गवारची आवक ७८ क्विंटलवरून ४८ क्विंटलपर्यंत घटली होती. मात्र, सरासरी दर ३ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. एकूणच, गवार बाजारात आवक आणि दरांमध्ये मिश्र चित्र दिसून आले होते. काही बाजारांमध्ये दर वाढले, तर काही ठिकाणी दरांमध्ये घसरण नोंदवली गेली होती..Fertilizer Supply: ‘होर्मूझ’मधून चार खतवाहू जहाजे भारताकडे रवाना; खरीपसाठी खतपुरवठ्याला दिलासा.मक्याचे भाव स्थिर गोरेगाव बाजारात हायब्रीड मक्याची आवक २५९ क्विंटलवर स्थिर राहिली होती. तसेच, किमान, कमाल आणि सरासरी दर २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलवर कायम होते. तर आज गोरेगाव बाजारात मक्याला २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसेच, मालेगाव बाजारात पिवळ्या मक्याची आवक ५६ क्विंटलवरून ११० क्विंटलपर्यंत वाढली होती. मात्र, सरासरी दर २ हजार २१२ रुपयांवरून २ हजार २०८ रुपये प्रति क्विंटलपर्यंत किंचित कमी झाला होता. या बाजारात मक्याचा कमाल दर २ हजार २४० रुपये प्रति क्विंटल होता. तर चाळीसगाव बाजारात मक्याची आवक १५० क्विंटलवरून ५० क्विंटलपर्यंत घटली होती. तसेच, सरासरी दर २ हजार १०८ रुपयांवरून २ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरला होता. बाजारात आज मक्याला कमीत कमी १ हजार ९०० रुपये ते जास्तीत जास्त २ हजार १७६ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. एकूणच, प्रमुख बाजारांमध्ये मक्याचे भाव बहुतांश स्थिर राहिले होते. त्यामुळे बाजारभावात कोणताही मोठा बदल दिसून आला नव्हता..डाळिंब बाजारात चढ-उतारराज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी-जास्त होत होती.त्यामुळे डाळिंबाच्या भावात आज चढ-उतार पाहायला मिळाले. सोलापूर बाजारात डाळिंबाची आवक आज वाढली होती. तसेच, सरासरी दर ७ हजार रुपयांवरून ८ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुधारला होता. तर सोलापुर बाजारात डाळिंबाला कमीत कमी १ हजार रुपये ते जास्तीत जास्त ३० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तसेच, नागपूर बाजारात डाळिंबाची आवक ६९९ क्विंटलवरून ५८९ क्विंटलपर्यंत घटली होती. मात्र, सरासरी आणि कमाल दर अनुक्रमे ५ हजार व ६ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. त्यामुळे डाळिंबाला कमीत कमी २ हजार रुपये ते जास्तीत जास्त ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर, सांगोला बाजारात भगवा डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत कमी झाली होती. तसेच, सरासरी दर १२ हजार ५०० रुपयांवरून ११ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरला होता. आज बाजारात डाळिंबाला कमीत कमी ५ हजार रुपये ते जास्तीत जास्त १७ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. एकूणच, सोलापूर बाजारात डाळिंबाच्या दरात सुधारणा झाली होती, तर सांगोला बाजारात दरांवर काहीसा दबाव राहिला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.