Tur, Chana Arrival : अमरावती बाजार समितीत तूर-हरभऱ्याची आवक वाढली

Tur, Chana Market : दरात सुधारणेमुळे शेतकऱ्यांची विक्रीसाठी लगबग
Tur, Chana Arrival
Tur, Chana ArrivalAgrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती ः
तुरीसोबतच हरभरा दरात सातत्याने सुधारणा होत असल्याच्या परिणामी शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीसाठी लगबग वाढली आहे. त्यामुळेच अमरावती बाजार समितीत दर दिवशी तुरीची साडेसहा हजार क्‍विंटल तर हरभऱ्याची विक्रमी १२ हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

अमरावती जिल्ह्यात रबी हंगामात हरभरा तर खरिपात आंतरपीक म्हणून तूर लागवड होते. यंदा या दोन्ही शेतीमालांचे दर हंगामाच्या सुरुवातीला दबावात होते. केंद्र सरकारकडून देखील ग्राहकहिताला प्राधान्य देत आयात-निर्यात धोरणात सातत्याने बदल केले जात आहेत.

त्यामुळे कधीही दर दबावात येण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच आता बाजारात तूर आणि हरभरा दरात काही अंशी सुधारणा होताच शेतकऱ्यांनी तूर आणि हरभरा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे.

Tur, Chana Arrival
Chana Arrival : खानदेशात हरभऱ्याची आवक सुरू

आठवडाभरापासून अमरावती बाजार समितीत हरभऱ्याची रोजची सरासरी आवक दहा हजार क्‍विंटलपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी (ता. ५) ही आवक १२ हजार ३८४ क्‍विंटलवर पोहोचली होती. सध्या हरभऱ्याला ५५०० ते ६१०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत आहे. तुरीचे दरही काहीसे दबावात असल्याने बाजार आवक मंदावत दोन ते तीन हजार क्‍विंटलपर्यंत मर्यादित झाली होती.

आता तुरीची आवक ६५५१ क्‍विंटलवर पोहोचली आहे. बाजारात तुरीला सध्या किमान ९५०० ते कमाल १०४०० असा दर मिळत आहे. त्यामुळेदेखील तूर विक्रीची लगबग वाढल्याचे सांगितले जाते. व्यापारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात ज्वारीदेखील गव्हाच्या तुलनेत भाव खात आहे. ज्वारी संकरीत-पाच या वाणाला २५०० ते २८५० रुपये दर मिळत २५ क्‍विंटलची आवक झाली. याचवेळी गव्हाचे व्यवहार किमान २४५० ते कमाल २७५० रुपये दराने होत असून आवक १३४७ क्‍विंटल आहे.

बाजारात कापूस हमीभावाच्या पुढे
केंद्र सरकारने कापसाला ७०२० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. सध्या कापसाचे दर वधारत ते ७२५० ते ७३४० रुपयांच्या दरम्यान आहेत. पणिामी कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे समाधान शेतकऱ्यांमध्ये आहे.

यापूर्वी कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. त्या कारणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विकल्याने बाजारात आवक अवघी ८० क्‍विंटलपर्यंत होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com