Agrowon Podcast : टोमॅटो दर सुधारले ; कापूस, सोयाबीन, टोमॅटो, तसेच मका दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, डाळिंब आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत. आज दुपारी वायदे ७४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५७ हजार प्रतिखंडीवर होते. तर जून महिना सुरु झाला तरी देशातील बाजारात कापसाची आवक कायम आहे. काल देशातील बाजारात ३५ हजार गाठी कापूस आवक झाली होती. याचाही परिणाम दरावर दिसत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडे वायदे दबावातच आहेत. सोयाबीनचे वायदे ११.८० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६१ डाॅलर प्रतिटनांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारावरील दबाव कायम आहे. याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसत आहे. देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Agrowon Podcast : तुरीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच कांदा दर काय आहेत?

टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला चांगलाच आधार मिळत आहे. पिकाला दुष्काळी परिस्थिती आणि आता पावसाचा फटका बसत आहे. राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक आजही सरासरीपेक्षा घटली आहे. दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे. त्यामुळे टोमॅटोचा भाव सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव सुधारतील, असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Ethanol Supply : तेल कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा मागणीच्या निम्माच

डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. डाळींब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. डाळिंबाचा उचांकी भाव काही ठिकाणी १५ हजार ते काही ठिकाणी २५ हजार रुपये दिसत आहे. पण डाळिंबाला सध्या सरासरी ८ हजार ते १० हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री, इथेनाॅल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com