Agrowon Podcast : टोमॅटो दरातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत कारले दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, टोमॅटो आणि कारली पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

कापूस वायदे दबावातच

कापसाच्या वायद्यांमधील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात वायदे दबावात आले. घटलेली मागणी आणि व्यापाऱ्यांची विक्री यामुळे कापूस भावात नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या ४ वर्षातील निचांकी पातळीवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८.०६ सेंट प्रतिपाऊंडवर आले. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ६०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनवरील दबाव कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडची विक्री वाढलेली आहे. विक्री वाढल्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कापसू वायदे ४ वर्षातील निचांकी पातळीवर; कापूस, सोयाबीन, मका, तसेच काय आहेत तूर दर?

टोमॅटोचा बाजार तेजीतच

बाजारातील टोमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहेत. तर दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे. यामुळे टोमॅटोचा भाव टिकून आहे. टोमॅटोला बाजारात सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

Agriculture Market
Sugar Industry : साखर, इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याची ‘विस्मा’ची मागणी

कारल्याला मागणी 

बाजारात वाढलेल्या पावसाने पालेभाज्या स्वस्त झाल्या. पण फळभाज्या अजही तेजीत आहेत. कारल्याचे भावही मागील काही दिवसांपासून तेजीत आहेत. सध्या बाजारातील कारल्याची आवक खपूच कमी झाली आहे. तर दुसरीकडे कारल्याला चांगला उठाव आहे. यंदा पाणी टंचाईमुळे कारल्याच्या लागवडी कमी होत्या. त्यामुळे पुरवठाही कमी झाला. परिणामी सध्या कारल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. कारल्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

हरभरा भाव टिकून

हरभरा बाजारात देशात टिकून आहे. सरकारने हरभरा भाव कमी करण्यासाठी अनेक उपाय केले. पण देशात हरभरा पुरवठा मर्यादीत असल्याने भाव काही प्रमाणात कमी झाले पण मोठी नरमाई आली नाही. तेजी मात्र रोखली गेली. सध्या हरभऱ्याला सरासरी ६ हजार ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. देशात सध्या हरभऱ्याची उपलब्धता कमी असल्याने यापुढच्या काळातही हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com