
Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये मोठी घट झाली. सोयाबीनचे वायदे आजही गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.८२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३०८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीन मागील तीन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७२.३९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील कापूस खंडीचे व्यवहार ५७ हजार ७०० हजार रुपयाने झाले. बाजार समित्यांमधील आवक आता खूपच कमी झाली. पण तरीही कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे. टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा २०० रुपयांपर्यंत वाढला आहे. बाजारातील कमी आणि चांगला उठाव, याचा टोमॅटोच्या बाजाराला आधार मिळत आहे. टोमॅटोचा बाजार सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.
कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पुर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली. पण कांद्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
नव्या हंगामातील हळद लागवड सुरु झाली. मागील वर्षभर हळदीला चांगला भाव मिळाला त्यामुळे यंदा हळद लागवड वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या हळदीची लागवड कशी होते याकडे बाजाराचे लक्ष आहे. पण दुसरीकड सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दरातील तेजी चढ उतार सोडले तर कायम राहण्याचा अंदाज आहे. सध्या हळदीला सरासरी १३ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.