Onion Import : अफगाणिस्तानमधून कांदा आयातीच्या पोकळ चर्चा

Onion Market Update : दोन महिन्यांनंतर बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान या कांदा उत्पादक राज्यांत रब्बी कांद्याची उपलब्धता कमी आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik Onion News : दोन महिन्यांनंतर बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान या कांदा उत्पादक राज्यांत रब्बी कांद्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला दराचा टेकू मिळाला आहे.

अशातच अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमार्गे किरकोळ ३ ते ४ ट्रक कांद्याची आयात दिल्लीत झाली. येथील एकूण आवकेच्या तुलनेत ही आवक नगण्य असतानाही आयातीचा गाजावाजा करून पोकळ चर्चा रंगवल्या जात आहेत.

दिल्लीमध्ये दररोज ३०० ट्रक कांद्यांची मागणी असते. या तुलनेत अफगाणिस्तानमधील कांद्याचा हंगाम अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे किरकोळ स्वरूपात आयात झाली. हा कांदा सध्या ओला असून त्याची प्रतवारी भारतीय कांद्याच्या तुलनेत स्पर्धात्मक नाही. मात्र असे असतानाही दिल्लीतील काही व्यापाऱ्यांमध्ये दर वाढवण्यासाठी दरवर्षी असे डाव खेळले जातात.

Onion Market
Onion Import : शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अफगानी कांदा थांबवा : किसान सभेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

तर राज्यातील व्यापारी याचा फायदा घेऊन स्थानिक बाजारात दर पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तानमधून कांदा आयातीच्या वृत्तास हवा दिली जात असल्याचे स्पष्ट आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसांनंतर येथील हंगाम सुरळीत होणार आहे.

तर येथील कांदा अद्यापही काढणीयोग्य नसून गुणवत्ता सर्वसाधारण आहे. त्यामुळे भारतीय कांद्यालाच दिल्लीत पसंती असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. दरवर्षी दिल्लीतील काही कांदा व्यापारी वाघा बॉर्डरमार्गे हा कांदा आयात करतात.

त्यामागे त्यांचे स्थानिक मागणी पुरवठ्याचे गणित सांभाळले जाते. मात्र त्याला इतर राज्यांतून आवक होणाऱ्या कांद्याची जोड दिली जात असली तरी मागणी पुरवठ्यावरच कांद्याचे गणित ठरणार आहे.

Onion Market
Onion Auction : शेतकऱ्याने उघड केला बेकायदा कपातीचा प्रकार

आयातीवर संपूर्ण बंदीची केंद्राकडे मागणी

अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. केंद्र सरकारकडेही ‘बफर स्टॉक’च्या (संरक्षित साठा) माध्यमातून पाच लाख टन कांदा आहे.

मागील काही वर्षांमध्ये कांद्याच्या दरात सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आहे. आता दरवाढ होऊन काहीसा दिलासा आहे. अशातच कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षड्‍यंत्र रचले जात आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला पुढील काळातही चांगला दर मिळावा यासाठी कांदा आयात करू नये, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com