Agrowon Podcast : कांद्याच्या भावातील चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत ज्वारीचे दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, ज्वारी आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market Update Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये घट

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई घट कायम आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई आली होती. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात आज भाव काहिसे कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७१.८५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

Market Update
Agrowon Podcast : टोमॅटोमधील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटोचे दर?

कांद्याचे भाव स्थिर

कांद्याचे भाव मागील दोन दिवसांपासून बहुतांशी बाजारांमध्ये स्थिर दिसत आहेत. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे. तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चढ उतार दिसत आहेत. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहिशी नरमाई आली होती. कांद्याचे भाव आज ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Raisin Market : बेदाण्याच्या दरात किचिंत वाढ

डाळिंबाचा भाव टिकून

राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव १० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण  शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com