Agrowon Podcast : सोयाबीनचा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत गहू दर

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, कांदा आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आज दुपारपर्यंत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली होती. दुपारी वायदे १२.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ३७१ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनवरील दबाव कायम आहे.

सोयाबीनची बाजारातील आवक कमी झालेली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातली मंदीचा दबाव देशातील बाजारावरही येत आहे. आजही सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. 

कापसाच्या वायद्यांमध्येही चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारतील वायदे आज दुपारपर्यंत ८१.३२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन ५८ हजार २०० रुपयांवर आले होते. देशातील बाजारातील आवक टिकून आहे.

तर दरपातळीही कायम दिसते. देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत आजचे गहू दर पाहुयात ?

टोमॅटोच्या बाजारातील भाव मागील तीन ते चार दिवसांपासून कायम आहेत. सध्या बाजारातील आवक कहीशी कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आवक काहीशी कमी झाली मात्र उठाव कायम असल्याने भावपातळी २०० ते ४०० रुपयांनी सुधारली आहे.

देशातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी १३०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Agriculture Market
Gram Market: सोयाबीन भाव, हरभरा बाजार, गहू दर, कापूस बाजारभाव

कांद्याच्या बाजारात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील कमी होत असलेली आवक आणि मागणी टिकून असल्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

कांद्याला आजही १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. कांदा बाजारातील आवक पुढील काही दिवसांनंतर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता. ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर उत्पादकता कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पण बाजारातील आवक वाढल्याने २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com