Market Bulletin: सोयाबीन दरात घसरणराज्यातील प्रमुख बाजार समितीतील अकोला बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची आवक शुक्रवारच्या तुलनेत ५३१ क्विंटलने वाढून १ हजार ५१३ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर १४५ रुपयांनी घसरुण ७ हजार ५० रुपये प्रति क्विंटल होते. तर, औसा बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत ७ क्विंटलने घटून १२९ क्विंटल झाली होती. सरासरी दर १३१ रुपयांनी घसरुण ७ हजार ८१ रुपये प्रति क्विंटल होते. तर, मुरुम बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक शुक्रवारच्या तुलनेत १०७ क्विंटलने घटून ९६ क्विंटल झाली होती. सरासरी दर ३१३ रुपयांनी घसरुण ६ हजार ७८१ रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाले.हरभरा दरात चढ-उतारआज अकोला बाजारात लोकल हरभऱ्याची आवक शुक्रवारच्या तुलनेत ३३८ क्विंटलने वाढून ४८७ क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर १५० रुपयांनी वाढून ६ हजार १५० रुपये प्रति क्विंटल झाले. तर, अहमदपूर बाजारात लोकल हरभऱ्याची आवक शुक्रवारच्या तुलनेत १३ क्विंटलने वाढून ६० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर ६ रुपयांनी घटून ६ हजार ३७ रुपये प्रति क्विंटल झाले होते..India Maize Market: मक्याला आधार मिळण्याची शक्यता.पालक दर स्थिरराज्यातील छत्रपती संभाजीनगर बाजारात पालकची आवक कालच्या तुलनेत २ हजार नगांनी घटून ११ हजार नग झाली होती. तसेच, सरासरी दर १२५ रुपयांनी वाढून ४०० रुपये प्रति नग होते. तर, पुणे-मोशी बाजारात लोकल पालकची आवक २०० नगांनी घटून आज ६ हजार ४०० नग झाली होती. मात्र, सरासरी दर १३ रुपये प्रति नगावर स्थिर होते. तसेच, श्रीरामपूर बाजारात पालकाची आवक कालच्या तुलनेत ९०० नगांनी घटून ४ हजार २०० नग झाली होती. तसेच, येथेही सरासरी दर ५ रुपये प्रति नगावरच स्थिर होते..Sugar Industry: साखरदर चार हजारांपुढे.फ्लॉवर दर टिकूनपुणे-मोशी बाजारात लोकल फ्लॉवरची आवक १८६ क्विंटलने वाढून ३९० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर ५०० रुपयांनी घटून १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल झाले.तर, कोल्हापूर बाजारात फ्लॉवरची आज १६६ क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर स्थिर राहून १ हजार रुपये प्रति क्विंटल होते. तसेच, चंद्रपूर-गंजवड बाजारात फ्लॉवरची आवक आज २४ क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर स्थिर राहून १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होते..पपईच्या आवकेत घटआज मुंबई फ्रुट मार्केटमध्ये पपईची आवक कालच्या तुलनेत १ हजार ४१५ क्विंटलने घटून १२० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर स्थिर राहून १ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होते. छत्रपती संभाजीनगर बाजारात पपईची आवक शनिवारच्या तुलनेत १० क्विंटलने घटून २० क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर ५० रुपयांनी घटून १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल झाले. तर, पुणे-मोशी बाजारात लोकल पपईची आवक कालच्या तुलनेत ५१ क्विंटलने घटून २८ क्विंटल झाली होती. तसेच, सरासरी दर २५० रुपयांनी वाढून २ हजार २५० रुपये प्रति क्विंटल होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.