Market Bulletin: सोयाबीन दर टिकूनराज्यातील सोयाबीन बाजारात आज आवक आणि दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. नागपूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत ८१ क्विंटलने कमी होऊन आज १ हजार ४७ क्विंटलवर आली होती, तर सरासरी दरात ३० रुपयांची घसरण होऊन ६ हजार ७५३ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर, तुळजापूर बाजारात आवक १२७ क्विंटलने कमी होऊन २४८ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात १०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. तसेच सिन्नर-हिवरगाव बाजारात आवक २६ क्विंटलने घटून ५७ क्विंटल झाली. मात्र सरासरी दर ६ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला..मका आवकेत चढ-उतारमका बाजारात आज बाजार समित्यांमध्ये सरासरी दरात सुधारणा दिसून आली. नागपूर बाजारात मक्याची आवक कालच्या तुलनेत ४४ क्विंटलने वाढून ५३५ क्विंटल झाली, तर सरासरी दरात ५६ रुपयांची वाढ होऊन २ हजार ७६२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर, सांगली-मिरज बाजारात मक्याची आवक १० क्विंटलने कमी होऊन २४० क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात ५० रुपयांची वाढ होऊन आजचा भाव ३ हजार २५० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. तसेच, अहिल्यानगरमधील कर्जत बाजारातील आवक १०६ क्विंटलने घटून २२७ क्विंटल झाली, तर सरासरी दरात ५० रुपयांची वाढ होऊन २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला..Agrowon Podcast: कापूस-गव्हाच्या बाजारात चढ-उतार; टोमॅटो दरात नरमाई, वांग्याची आवक घटली तर केळी दरात घसरण.काकडीच्या दरात घसरणआज काकडीच्या बाजारात बहुतेक ठिकाणच्या बाजार समितीतील दरात घसरण पाहायला मिळाली. पुणे-मोशी बाजारात काकडीची आवक कालच्या तुलनेत १३ क्विंटलने वाढून १५८ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात १ हजार रुपयांची मोठी घसरण होऊन आजचा दर १ हजार ५०० रुपये होता. पनवेल बाजारात हीच आवक १० क्विंटलने कमी होऊन ८० क्विंटल झाली, तर सरासरी दर ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर पाहायला मिळाला. त्याचबरोबर, खेड-चाकण बाजारात काकडीची आवक ८० क्विंटलवर कायम राहिली होती, मात्र सरासरी दरात ५०० रुपयांची घसरण होऊन १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याचे चित्र होते..Early Grape Season: अर्ली द्राक्ष हंगामात मुहूर्ताला २४१ रुपये दर.झेंडूच्या बाजारात चढ-उतारझेंडूच्या बाजारात आज आवक आणि दरांमध्ये वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. खेड-चाकण बाजारात झेंडूची आवक मागील दिवसाच्या तुलनेत १५० क्विंटलने वाढून आज २१० क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन २ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. दुसरीकडे, भुसावळ बाजारात झेंडूची आवक परवाच्या तुलना करता १ क्विंटलवरुन आज तब्बव १२८ क्विंटलवर पोहोचली असून, सरासरी दरात ५०० रुपयांची वाढ होऊन आज २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे..चिकूचे दर टिकूनचिकू बाजारात आज काही बाजार समित्यांमध्ये दरात वाढ, तर काही ठिकाणी घसरण झाली. सांगलीच्या फळे-भाजीपाला बाजारात चिकूची आवक कालच्या तुलनेत ५ क्विंटलने कमी होऊन आज १०७ क्विंटल झाली, मात्र सरासरी दरात ५०० रुपयांची वाढ होऊन आजचा दर ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. तर, अमरावतीच्या फळ आणि भाजीपाला बाजारात चिकू आवक २८ क्विंटलने वाढून ६७ क्विंटल झाली, तर सरासरी दरात १ हजार रुपयांची घसरण होऊन ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्याचबरोबर, छत्रपती संभाजीनगर बाजारात चिकूची आवक ३ क्विंटलने वाढून आज २५ क्विंटल पाहायला मिळाली. मात्र सरासरी दरात ४५० रुपयांची घसरण होऊन ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.