Market Bulletin: सोयाबीन दरात चढ-उतारराज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी कारंजा बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत ५२५ क्विंटलने वाढून आज १ हजार २२५ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात २५ रुपयांची घसरण होऊन तो दर आज ७ हजार ५० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, अकोला बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत ५१७ क्विंटलने घटून आज २६९ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात १७० रुपयांची वाढ होऊन तो ७ हजार ५५ रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, मुर्तीजापूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची आवक परवाच्या तुलनेत २३० क्विंटलने घटून आज १५० क्विंटल राहिली. सरासरी दरात ५ रुपयांची वाढ होऊन तो ६ हजार ८२० रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला..हरभरा आवकेत चढ-उतारआज कारंजा बाजारात हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत ६०० क्विंटलने वाढून आज ९०० क्विंटल झाली. सरासरी दरात ७५ रुपयांची वाढ होऊन तो ५ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, मुर्तीजापूर बाजारात स्थानिक हरभऱ्याची आवक २०० क्विंटलवर स्थिर राहिली. सरासरी दरही ६ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतकाच कायम राहिला. तसेच, नागपूर बाजारात स्थानिक हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत १२ क्विंटलने घटून आज १९६ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात ३६३ रुपयांची वाढ होऊन तो ६ हजार १९६ रुपये प्रति क्विंटल होता..Papaya Price: मागणी वाढल्याने पपईच्या दरात सुधारणा.टोमॅटो आवकेत घसरणराज्यातील नागपूर बाजारात स्थानिक टोमॅटोची आवक परवाच्या तुलनेत २५० क्विंटलने घटून आज १,०५० क्विंटल झाली. सरासरी दरात २२५ रुपयांची घट होऊन तो १ हजार ३७५ रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, पुणे-मोशी बाजारात स्थानिक टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत ११६ क्विंटलने घटून आज ३११ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात ४०० रुपयांची वाढ होऊन तो १ हजार १५० रुपये प्रति क्विंटल झाला. तसेच, अहिल्यानगर बाजारात टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत ८६ क्विंटलने घटून आज २४० क्विंटल राहिली. सरासरी दरात ५० रुपयांची घट होऊन तो १ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल होता..Agrowon Podcast: कापूस दरात स्थिरता, ज्वारी दरात चढ-उतार, तूर आवकेत घट, वांग्याच्या दरात घसरण तर शेपू दरात बदल.मेथी दरात बदलआज छत्रपती संभाजीनगर बाजारात मेथीची आवक परवाच्या तुलनेत ६ हजार ५०० नगांनी घटून आज ९ हजार ५०० नग झाली. मात्र, सरासरी दरात ३५० रुपयांची वाढ होऊन तो १ हजार १०० रुपये प्रति शेकडा राहिला. तर, पुणे-मोशी बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत ३०० नगांनी वाढून आज ७ हजार ६०० नग झाली. सरासरी दरात ५ रुपयांची घट होऊन तो १८ रुपये प्रति नग नोंदविण्यात आला. तसेच, श्रीरामपूर बाजारात मेथीची आवक कालच्या तुलनेत १ हजार ८०० नगांनी घटून आज ४ हजार नग झाली. मात्र, सरासरी दर १२ रुपये प्रति नगावरच स्थिर राहिला..केळी दरात सुधारणाराज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी यावल बाजारात क्रमांक १ केळीची आवक कालच्या तुलनेत २७५ क्विंटलने वाढून आज ९८० क्विंटल झाली. सरासरी दरात १५० रुपयांची वाढ होऊन तो १ हजार ८६० रुपये प्रति क्विंटल राहिला. तर, पुणे-मोशी बाजारात स्थानिक केळीची आवक ७१ क्विंटलवरून ७२ क्विंटल झाली. मात्र, सरासरी दर ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतकाच स्थिर राहिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.