Agrowon Podcast : कांद्याचे भाव दबावातच ; कापूस, सोयाबीन, गहू तसेच हरभरा यांचे दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon

Market Bulletin : कापूस भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे कमी होऊन ८२.६५ सेंटवर आले होते. तर देशातील वायदे ६० हजार १०० रुपये प्रतिखंडीवर होते. सीसीआयनेही आपले कापूस विक्रीचे भाव कमी केले आहेत. याचाही दबाव देशातील बाजारावर आला. देशातील कापसाचे भाव गेल्या तीन दिवसांमध्ये सरासरी ३०० रुपयांनी कमी आले आहेत. तर सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजरातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय ? कापूस, सोयाबीन , तूर, टोमॅटो यांचे काय आहेत बाजारभाव?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे भाव ११.७२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आले होते. देशातील बाजारात मात्र आज भाव काहीसे स्थिरावले होते. सोयाबीनची बाजारातील आवकही ९० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावातील नरमाई कायम आहे. बाजारातील आवक मर्यादीत असतानाही कांदा भाव निर्यातबंदीमुळे दबावात आहेत. नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीचाही बाजाराला आधार मिळताना दिसत नाही. निवडणूक आणि सरकारच्या धोरणाच्या परिणामुळे सध्या भाव १००० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Onion Market : नियमनमुक्तीद्वारे फुटली कांदा कोंडी

देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यातच उत्पादकतेला मोठा फटका बसल्याचे शेतकरी  तर काही बाजारांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत. उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढलेले आहेत. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली. हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले. मात्र पिवळ्या वाटाण्याची आयात, सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक, यामुळे भावावर दबाव आहे. हरभऱ्याच्या भावात पुढील महीना दीड महिना १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com