Agrowon Podcast : कांद्याचे भाव दबावातच ; कापूस, सोयाबीन, गहू, तसेच लिंबूचे दर काय आहेत?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. कापसाच्या वायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात काल सुधारणा झाल्यानंतर आज मात्र मोठी नरमाई आली होती. कापूस वायदे तब्बल ४ टक्क्यांनी नरमले. आज दुपारपर्यंत कापूस वायदे ७८.२९ सेंट प्रतिपाऊंपर्यंत कमी झाले होते. दुपारनंतर कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून येत होती.

देशातील वायदेही कमी होऊन ५८ हजार प्रतिखंडीवर आले होते. तर देशातील बाजार समित्यांमधील भावपातळी स्थिर होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काहीसे स्थिर होते. पण सोयापेंडच्या वायद्यांमध्ये दीड टक्क्यांची वाढ होऊन ३५९ डाॅलर प्रतिटनांवर होते. तर सोयाबीनचे वायदे ११.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारात सोयाबीन मात्र स्थिर आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भावही स्थिरावले होते.

बाजारातील सोयाबीन दुसरीकडे कमी झालं. तरीही सोयाबीनचा भाव ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. सोयाबीन आणखी काही दिवस याच पातळीच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांदा निर्यातीवरून सुरु असलेल्या गदारोळाचा भावाला मात्र काहीच आधार मिळाला नाही. सरकारने बाजारात जुनीच बातमी पसरवली होती. त्यामुळे कांदा दर जैसे थेच आहेत. बाजारातील आवक कमी असूनही सध्या कांद्याला सरासरी ११०० ते १४०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.

तर दुसरीकडे कांद्याला वाढलेल्या उष्णतेचाही फटका बसत आहे. कांद्याची बाजारातील आवक आणखी काही आठवड्यांनंतर कमी होईल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

वाढत्या उन्हाबरोबरच लिंबाच्या भावातही चांगलीच वाढ होत आहे. लिंबाचे भाव घाऊक बाजारात तेजीत आहेत. किरकोळ बाजारातही लिंबू नगाला १० रुपयांपर्यंत पोचलं. राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला.

त्यामुळे लिंबालाही मागणी वाढली. पण दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक कमी झालेली आहे.सध्या बाजारात लिंबुला गुणवत्तेप्रमाणे ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लिंबुचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे. सरकारची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचाही आधार आहे. तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.

त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com