Nagpur News : गव्हाच्या मागणीत सातत्याने वाढ आणि घट होत आहे. परिणामी दरातही चढ-उतार होत असल्याची स्थिती आहे. कळमना बाजार समितीत स्थानिक गहू वाणाचे व्यवहार सद्यःस्थितीत २,२०० ते २,४४२ रुपयांनी होत आहेत. याचवेळी सरबती गहू ३,१०० ते ३,५०० रुपयांवर स्थिर होता. गव्हाची आवक सरासरी १,००० क्विंटलच्या घरात आहे.
कळमना बाजार समितीचा विचार करता या बाजारात सीमेवरील मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यातून देखील गव्हाची आवक होते. त्यामुळेच गेल्या महिनाभरापासून आवक १,००० ते २,००० अशी होत आहे. आवकेमध्ये चढ-उतार होत असताना दरातही मोठे बदल होत असल्याचे अनुभवले जात आहे.
स्थानिक गहू वाणाची आवक २५ एप्रिलला उच्चांकी २००० क्विंटलवर पोहोचली होती. या वेळी २,२०० ते २,५०० रुपयांचा दर मिळाला. त्याचवेळी सरबती गव्हाची आवक देखील १,९६४ क्विंटल होती. याला ३,१०० ते ३,५०० रुपयांचाच दर गेल्या महिनाभरापासून मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
कारंजा (वाशीम) बाजारात गव्हाची आवक तीन हजार क्विंटलवर पोहोचली आहे. या ठिकाणी २,३०० ते २,५८५ रुपयांनी याचे व्यवहार होत असून सरासरी दर २,८१० रुपयांचा होता. अकोला बाजार समितीतही गव्हाची आवक २०३ क्विंटलची नोंदविण्यात आली. या ठिकाणी गव्हाला २,१९५ ते २,८१० रुपयांचा दर मिळत आहे.
सरासरी दर २,५३५ रुपयांचा होता. शेगाव (बुलडाणा) बाजारात गव्हाची अवघी वीस क्विंटलची आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या या गव्हाला २,००० ते २,५३० रुपयांचा दर मिळाला. यवतमाळ बाजार समितीमध्ये गव्हाला २,१०० ते २,४०० रुपयांचा दर मिळाला. प्रक्रिया उद्योगाची मागणी दरावर सर्वाधिक परिणाम करणारी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
लोकवन गव्हाची १,२३३ क्विंटल आवक
अमरावती बाजार समितीत नव्या गव्हाची आवक होत आहे. लोकवन जातीच्या गव्हाची आवक १,२३३ क्विंटल नोंदविण्यात आली. याला २,४५० ते २,७५० रुपयांचा दर मिळाला. मिलसाठीचा गहू २,३०० ते २,४२५ रुपये असून याची आवक मात्र झाली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.