Onion Export
Onion ExportAgrowon

Agrowon Podcast : कांदा दरात चढ उतार ; जाणून घ्या कापूस, सोयाबीनचे आजचे भाव

Onion Rate : कांद्याच्या भावात मागील तीन दिवसांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील कमी झालेली आवक आणि चांगला उठाव याचा दराला आधार मिळाला.
Published on

सोयाबीनमध्ये नरमाई

हमीभावाने सोयाबीनची खरेदी थांबल्यानंतर बाजारातील नरमाई कायम आहे. सोयाबीनचा कमी झालेला भाव आजही कायम होता. आजही देशातील बाजारात सोयाबीन सरासरी ३ हजार ८०० ते ३ हजार ४०० रुपयांनी विकले गेले. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव आजही ४ हजार ३०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान काढले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तर देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनवरील दबाव कायम राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे भाव स्थिर

देशातील बाजारात कापसाची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून स्थिर आहे. तर सीसीआयची खरेदीही सुरु आहे. त्यामुळे कापसाचा बाजारभावही स्थिरावलेला दिसत आहे. खुल्या बाजारात सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे.

वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसत असले तरी सरासरी भावापतळी स्थिर दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे. देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Onion Export
Cotton Bag Corruption: कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत ४१ कोटींचा भ्रष्टाचार

गव्हाचे दर तेजीतच

गव्हाच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील गव्हाची आवक कमी होत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईमुळे गव्हाला चांगला उठाव आहे. यामुळे गव्हाचे भाव तेजीत आले आहेत. गव्हाचा भाव देशभरात सरासरी ३२०० ते ३३०० रुपयांवर पोचला. गव्हाची बाजारात आवक सुरु झाल्यानंतर भाव कमी होतील.

पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता धुसर असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावी लागेल. तसेच बाजारातील पाईपलाईनही रिकामी आहे. म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणीही चांगली राहील. याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो.

Onion Export
Onion Market : कांदा खरेदीतील गैरव्यवहार ; १५ महासंघांवरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

कांद्यात काहीशी सुधारणा

कांद्याच्या भावात मागील तीन दिवसांमध्ये पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील कमी झालेली आवक आणि चांगला उठाव याचा दराला आधार मिळाला. आज बाजारात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.

बाजारातील कांदा आवक काही प्रमाणात कमी जास्त होण्याचा अंदाज आहे. तसेच बाजारातील कांद्याची आवक लगेच मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता धुसर आहे. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केळीचे दर टिकून

केळीच्या भावात मागील तीन आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली. केळीला कुंभ मेळ्यानिमित्त उठाव चांगला आहे. यामुळे केळी दरात सतत वाढ झाली. तर बदलते वातावरण आणि नुकसान यामुळे केळीची आवक कमीच आहे. देशभरात सध्या राज्यातील केळीला उठाव दिसत आहे.

त्यामुळे राज्यभरात केळीच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली. दोन आठवड्यांपासून केळीचा बाजारभाव सध्या १६०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. केळीच्या आवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम दरावर दिसेल, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com